पुणे : पुणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात १७ हजार ५७० घरांच्या खरेदीचे व्यवहार झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. या व्यवहारातून सरकारला ६२० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले असून, त्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के वाढ झाली आहे.

नाइट फ्रँक इंडियाने पुणे जिल्ह्यातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागाचा समावेश आहे. या अहवालानुसार, पुणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात १७ हजार ५७० घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात घरांची विक्री १४ हजार २८४ होती. त्यात यंदा २३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. याचबरोबर गेल्या महिन्यातील घरांच्या व्यवहारातून सरकारला ६२० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले. गेल्या वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत त्यात २० टक्के वाढ झाली आहे.

man was stabbed to death in a fight between two groups in nagpur
नागपुरातली गुन्हेगारी थांबेना… आता दोन गटांच्या भांडणात एकाची भोसकून हत्या…
n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

हेही वाचा…गैरप्रकार केलेल्या वीस शाळांची सीबीएसईकडून संलग्नता रद्द; राज्यातील दोन शाळांचा समावेश

फेब्रुवारीमध्ये घरांच्या विक्रीत ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या घरांचा वाटा सर्वाधिक आहे. एकूण विक्रीत त्यांचे प्रमाण ३२ टक्के आहे. त्याखालोखाल २५ ते ५० लाख रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण ३० टक्के आहे. याचवेळी २५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांच्या विक्रीतही वाढ होऊन त्यांचे प्रमाण २२ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ते १६ टक्के होते. एकूण विक्रीत १ कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांचे प्रमाण १४ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत ते १० टक्के होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मध्यम आकाराच्या घरांना ग्राहकांची मोठी मागणी दिसून आली आहे. घरांच्या विक्रीत ५०० ते ८०० चौरस फुटांच्या घरांचे प्रमाण सर्वाधिक ४० टक्के आहे. त्या खालोखाल ५०० चौरस फुटांपेक्षा लहान घरांच्या विक्रीचे प्रमाण ३५ टक्के आहे. याचवेळी १ हजारहून अधिक चौरस फुटांच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण १३ टक्के आहे, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा…पिंपरी : आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि घोषणाबाजी… परखड चर्चेमुळे चिंचवडला रंगला मावळचा रणसंग्राम

पुण्यात परडवणारी घरे उपलब्ध असल्याने ग्राहकांची पसंती मिळत आहे. चालू वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात घरांच्या विक्रीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. या वर्षात घरांना चांगली मागणी दिसून येणार आहे, असे नाइट फ्रँक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले.

हेही वाचा…पुणे : ‘रिंगरोडचे भूसंपादन करताना तक्रारी आल्यास…’ जिल्हाधिकाऱ्यांची तंबी

फेब्रुवारीतील घर खरेदीदारांचे वय

वयोगट – फेब्रुवारी २०२३ मधील खरेदीत हिस्सा – फेब्रुवारी २०२४ मधील खरेदीत हिस्सा
३० वर्षांखालील – २१ टक्के – २४ टक्के
३० ते ४५ वर्षे – ५६ टक्के – ५३ टक्के
४५ ते ६० वर्षे – १७ टक्के – १७ टक्के
६० वर्षांवरील – ५ टक्के – ६ टक्के