लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शेतकरी दाम्पत्याचे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. शेतात कांदा काढणी करत असताना पोलीस भरती प्रक्रियेतील उत्तीर्णांची यादी जाहीर झाली आणि दोघे उत्तीर्ण झाल्याचे समजताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

शिरुर तालुक्यातील चांडोह गावातील रहिवासी तुषार शेलार आणि त्यांची पत्नी भाग्यश्री शेलार यांनी पोलीस भरतीची तयारी केली होती. तुषार शेलार शेतकरी आहेत. २०२० मध्ये तुषार यांचा विवाह भाग्यश्री यांच्याशी झाला. त्यानंतर दोघांनी पोलीस भरती होण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पोलीस भरती प्रक्रियेत दोघे सहभागी झाले. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा त्यांनी दिली. दोनही परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पोलीस दलात निवडल्या गेलेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली. यादीत तुषार आणि भाग्यश्री यांची निवड झाल्याने चांडोह गावातील रहिवाशांनी जल्लोष केला.

आणखी वाचा- पिंपरी: शालेय जीवनातच शहरातील विद्यार्थ्यांना गंभीर आजारांचा विळखा

तुषार आणि भाग्यश्री यांनी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी सुरु केली होती. शारीरिक चाचणीची तयारी त्यांनी केली. शेतात त्यांचे घर आहे. शेतीची कामे करुन दोघे जण भरतीची तयारी करत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतीमालाला भाव नसल्याने आम्ही संकटात सापडलो होतो. अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते. पोलीस भरती प्रक्रियेत निवड झाल्याचे समजताच सारे दु:ख विसरलो, अशी भावना शेलार दाम्पत्याने व्यक्त केली.