पुणे : कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर असलेल्या हांडेवाडी चौकातील वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदक करण्यात आले आहेत.कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गाचा वापर सासवड, तसेच हडपसरकडे जाणारी वाहने करतात. बाह्यवळण मार्गावर उंड्री, पिसोळी, हांडेवाडी भाग आहे. या भागात गेल्या दहा वर्षात अनेक गृहप्रकल्प बांधण्यात आले आहेत. बाह्यवळण मार्ग अहोरात्र गजबलेला असतो. हांंडेवाडी चौकात होणारी कोंडी, तसेच बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या भागातील वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
श्रीराम चौक, जेएसपीएम महाविद्यालय, हांडेवाडी चौकातून कात्रज, तसेच हडपसर-सासवड रस्त्यावरील मंतरवाडी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी डावीकडे वळावे. कात्रजकडून येणऱ्या वाहनांनी मंतरवाडीकडे जाऊन जोगेश्वरी मिसळ येथून उजवीकडे वळावे. तेथून इच्छितस्थळी जावे. श्रीराम चौक, जेएसपीएम महाविद्यालय, हांडेवाडी चौकातून होळकरवाडी, कात्रजकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी डावकडे वळावे.
कात्रजकडून मंतरवाडीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरुन उजवीकडे वळावे. तेथून इच्छितस्थळी जावे.
होळकररवाडी, मंतरवाडीकडून येणाऱ्या दुचाकी, मोटारींनी जेएसपीएम महाविद्यालय, श्रीराम चौक, सय्यदनगर, हडपसरकडे जाण्यासाठी हांडेवाडीकडून कात्रजकडे जावे. शिवेंद्र हाॅटेलकडून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे. होळकरवाडी, मंतरवाडीकडून येणाऱ्या अवजड वाहनांनी मयुरी वजनकाटा येथून वळावे. तेथून जेएसपीएम महाविद्यालय, सय्यदनगर, हडपसरकडे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत वाहनचालकांच्या काही सूचना असल्यास लेखी स्वरुपात वाहतूक शाखा, येरवडा कार्यालयात पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
