पुण्यातील उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील कचरा डेपोला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्निशामक दलाचे सुरू असून आतापर्यंत २०० टँकरचा वापर करण्यात आला आहे. तर आठवडयाभरात आग नियंत्रणात येईल. अशी माहिती अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उरूळी देवाची आणि फुरुसुंगी कचरा डेपोमधील हंजर प्रकल्पाच्या परिसरात शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आगीचे स्वरुप भीषण असल्याने परिसरात सर्वत्र धूराचे लोट पसरले होते. याचा फटका परिसरातील वाहनचालकांना बसला. धूरामुळे त्यांना वाहन चालवताना अडथळा येत होता. आगीचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.