पुणे : देशभरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार आणि सन्मान करण्यात येत आहे. त्याच दरम्यान विद्येच माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणार्या पुणे शहरातील के.के मार्केट ते चव्हाणनगर रोड दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास भररस्त्यात तरुणीला एकजण लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत असल्याची घटना घडली आहे. तर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या प्रकरणी सहकारनगर पोलिस स्टेशन च्या निरीक्षक एस.चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, तरुणीला एकजण मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ आमच्याकडे प्राप्त झाला असून याबाबत आमच्याकडे संबधित तरुणी किंवा अन्य कोणी तक्रार दिलेली नाही.मात्र आमच्या टीमकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.