पुणे : डेक्कन जिमखाना परिसरातील गुंड तडीपार

मारामारी, लूट, दहशत माजविल्या प्रकरणी गुन्हे दाखल

crime
(सांकेतिक फोटो)

डेक्कन जिमखाना परिसरातील गुंडाला पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. राहुल राजेंद्र देवकर (रा. पवार क्वाटर्स, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) असे तडीपार केलेल्या गुंडाचे नाव आहे.

देवकर याच्या विरोधात डेक्कन तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मारामारी, लूट, दहशत माजविल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. देवकर दहशत माजवित असल्याने त्याच्या विरोधात कोणी तक्रार देत नव्हते. त्याला शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक शफील पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक बाबासाहेब झरेकर, उपनिरीक्षक किशोर शिंदे, राकेश गुजर,बोरसे, बोरकर, ननावरे यांनी सादर केला. त्यानतंर त्याला शहरातून वर्षभरासाठी तडीपार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune goon tadipar in deccan gymkhana area pune print news msr 87

Next Story
पुण्यात धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी