महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरीता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (ऑप्टिंग आऊट) पर्यायासंदर्भातील कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केल्या आहेत. या सुधारणांसंदर्भातील निर्णय सर्व प्रलंबित आणि या पुढील सर्व स्पर्धा परीक्षांच्या निकाल प्रक्रियेपासून लागू राहणार आहे.

हेही वाचा – पुणे : संरक्षण विषयक स्थायी समितीची दक्षिण कमांड मुख्यालयाचा भेट

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाच्या फलनिष्पत्तीचा साकल्याने विचार करून कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यमान कार्यपध्दतीनुसार सर्व भरती प्रक्रियेसाठी अंतिम शिफारशीपूर्वी सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. स्पर्धा परीक्षेद्वारे बहुसंवर्गीय भरती प्रक्रियेसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे प्रथम संवर्गाचा पसंतीक्रम सादर करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी संबंधित उमेदवारांना दिला जाईल. प्राप्त पसंतीक्रमाच्या आधारे प्रचलित पध्दतीनुसार तात्पुरती निवड यादी तयार करण्यात येईल. बहुसंवर्गीय भरती प्रक्रिया नसलेल्या स्पर्धा परीक्षांकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे प्रचलित पध्दतीनुसार तात्पुरती निवड यादी तयार करून संकेतस्थळावर प्रसिद्ध करून त्या आधारे भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांना सात दिवसांचा कालावधी देण्यात येईल. तात्पुरती निवड यादी आणि भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सादर केलेल्या उमेदवारांचा विदा (डेटा) लक्षात घेऊन अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येईल. बहुसंवर्गीय भरती प्रक्रियेसाठी पदांचे पसंतीक्रम सादर करणे, तसेच सर्व स्पर्धा परीक्षेद्वारे भरती प्रक्रियेसाठी भरतीप्रक्रियेतून बाहेर पडणे या बाबतची कार्यवाही फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विहित कालावधीमध्ये करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प सादर करण्यासंदर्भातील उपरोक्त कार्यपद्धती केवळ स्पर्धा परीक्षांसाठी लागू राहील. विशिष्ट पात्रता, विशिष्ट अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीसाठी उपरोक्त निर्णय लागू करण्यात येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.