मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरतर्फे (एमसीसीआयए) २० आणि २१ फेब्रुवारीला पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट आयोजित करण्यात आले आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, अमेरिका, स्वित्झर्लंड, नॉर्वे, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, इस्रायल आदी देशांच्या वकिलांतींचे प्रमुख आणि तेथील सरकारचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमसीसीआयएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. २० फेब्रुवारीला परिषदेच्या उद्घाटनानंतर पुण्यातील कंपन्यांच्या यशोगाथा, पुण्यातील आंतरराष्ट्रीय उद्योगाचे भविष्य, जागतिक स्तरावरील संधी, तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास, आंतरराष्ट्रीय उद्योगासाठीची संधी देणारे नवसंशोधन आदी विषयांवर चर्चा करण्यात येईल. राजनैतिक अधिकाऱ्यांशी संवाद, दुबई आणि केझाद, पेनसेल्व्हिनिया, फ्लँडर्स, फ्रँकफर्ट अशा शहरांवर केंद्रीत चर्चा यासह पुणे जिल्ह्यात गुंतवणूक या विषयीची सत्रे होतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग विभागातील परकीय व्यापार विभाग, राज्य शासनाचा उद्योग विभागातील अधिकारी, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.