प्रशांत गिरबने, विश्वस्त व सरचिटणीस, पुणे इंटरनॅशनल सेंटर

वेळ : २०११ च्या उन्हाळ्यातील सायंकाळ. स्थळ : कोरेगाव पार्कमधील पिंगळे मळा. सुरेश पिंगळे यांनी बालणपणीचे मित्र व सध्याचे शेजारी डॉ. विजय केळकर हे पुण्यात परतल्यानिमित्त मेजवानीचे आयोजन केले होते. डॉ. केळकर हे केंद्रीय पेट्रोलियम सचिव, वित्त सचिव आणि वित्तीय आयोगाचे अध्यक्ष अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडून पुण्यात परतले होते. त्या मेजवानीला अनेक पुणेकरांनी हजेरी लावली होती. त्यात सीएसआयआरच्या महासंचालकपदाची जबाबदारी पार पाडून पुण्यात परतलेले प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचाही समावेश होता.

Why government servants could not participate in the work of Rashtriya Swayamsevak Sangh
शासकीय सेवकांना आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामकाजात सहभागी का होता येत नव्हते?
RSS News
RSS News: सरकारच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उत्तर, “आपल्या राजकीय स्वार्थासाठी…”
mpsc, mpsc news, mpsc latest news,
आता सरळसेवा भरती ‘एमपीएससी’मार्फत होणार, शासन निर्णयात काय आहेत तरतुदी बघा
mpsc Mantra Group B Non Gazetted Services Main Exam current affairs
mpsc मंत्र: गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा; चालू घडामोडी
nashik electric charging stations marathi news
इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्रांचा विस्तार, नाशिक शहरात आणखी नऊ केंद्रांना मान्यता
caste, OBC, Booth-wise survey,
ओबीसीतील कोणती जात दुरावली? भाजपचे बुथनिहाय सर्वेक्षण सुरू
ajit pawar announces gharkul yojana for scheduled castes in budget
मागासवर्गीयांच्या वाट्यास अर्थसंकल्पात केवळ घरकुले
Need of faith and sanskar to prevent addiction in youth says mohan bhagwat
तरूणांतील व्यसनाधीनता रोखण्यासाठी श्रध्दा व संस्काराची गरज, सरसंघचालकांचे सोलापुरात सिध्देश्वर दर्शन

त्यावेळच्या चर्चेत अनेक विषय होते परंतु, त्यातील एक विषय सर्वाधिक काळ चर्चिला गेला. तो होता पुण्यात ‘थिंक टँक’ (विचार विनिमय केंद्र) स्थापन करण्याचा. डॉ. माशेलकर आणि डॉ. केळकर यांनी त्यावर आधीही चर्चा केली होती. मात्र, त्या सायंकाळी त्यांचा सूर वेळ न दवडता लवकरात लवकर ‘थिंक टँक’ सुरू करण्याचा होता. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून हे काम करावे, अशी दोघांची धारणा.

हेही वाचा… वर्धानपनदिन विशेष : ‘सीडॅक’, इलेक्ट्रॉनिक ‘आयसीटी’त देशाला स्वावलंबी बनवण्याचा वसा!

उत्तम सरकारी धोरणातून भक्कम लोकशाही बनते यावर त्या दोघांचाही विश्वास. त्यामुळे सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा सरकारी सद्या व भावी धोरणांवर सर्व घटकांचे म्हणणे जाणून घेत त्यावर जास्तीतजास्त चर्चा, विचारविनिमय, वादविवाद होणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. भक्कम लोकशाही अससेल्या विकसित अर्थव्यवस्थांमध्ये अनेक ‘थिंक टँक’ असतात आणि या संस्था धोरणनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावतात. हे ‘थिंक टँक’ समाजातील विविध घटकांकडून त्यांचे मत जाणून घेऊन तटस्थपणे धोरणात्मक शिफारशी मांडतात. सरकारी धोरणनिर्मिती करताना या शिफारशीची गंभीर दाखल घेणे हे सक्षम प्रजासत्ताकाचे लक्षण आहे. भारतातही आर्थिक प्रगतीला जोड देणाऱ्या अशा ‘थिंक टँक’ हव्या आहेत. त्यातून विकास हा शाश्वत व सर्वसमावेशक बनविण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली जाऊ शकते.

पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशळेत (एनसीएल) जून २०११ मध्ये या संकल्पनेला मूर्त स्वरुपात आणण्याचा दिशेने पाऊल पडले. त्यावेळी डॉ. माशेलकर आणि डॉ. केळकर यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. त्यावेळी मला या ‘थिंक टँक’च्या संकल्पनेबद्दल माहिती नसल्याने या बैठकीला उपस्थित नव्हतो. मी लंडनमध्ये टाटा समूहात सात ते आठ वर्षे काम केल्यानंतर स्वयंउद्याोजकतेच्या संधीच्या शोधात पुण्यात परतलो होतो. एका स्वयंउद्याोजकाच्या नवउद्यामी कंपनीसोबत (स्टार्ट अप) मी काम करीत होतो. त्या स्वयंउद्याोजकाचे इतरही व्यवसाय होते. त्यातील एका व्यवसायाच्या संचालक मंडळावर माजी सनदी अधिकारी होते. त्यांनी या ‘थिंक टँक’बाबत (पुणे इंटरनॅशनल सेंटर-पीआयसी) मला माहिती दिली. मी त्यावेळी नवउद्यामी कंपनीसोबत काम करीत असतानाच स्वयंसेवक म्हणून लगेचच ‘थिंक टँक’मध्ये सहभागी झालो. तेव्हापासून आजतागायत मी पीआयसीचा स्वयंसेवक आहे व एकापाठोपाठ एक विनापगारी जबाबदारी आनंदाने सांभाळतो आहे. पीआयसीमधील माझ्या जबाबदारीमुळे, हा ‘थिंक टँक’ आकार घेत असताना मला जवळून पाहता आले.

नंदन नीलेकणी यांनी पीआयसीचे पहिले स्वागत भाषण २४ सप्टेंबर २०११ रोजी दिले. त्यावेळी दिवंगत मोहन धारिया अध्यक्ष होते. त्याला आता १२ वर्षे उलटून गेली आहेत. या कालावधीत पीआयसीने आजपर्यंत ३५६ विविध कार्यक्रम हाती घेतले. त्यात व्याख्याने, परिषदा, कार्यशाळा, पुस्तक प्रकाशने आणि चित्रपट महोत्सवांचा समावेश आहे. पीआयसीने सार्वजनिक धोरणावरील ५० हून अधिक धोरणात्मक संशोधन अहवालांचे प्रकाशन केले असून, त्यात राष्ट्रीय सुरक्षा, ऊर्जा, पर्यावरण व तापमान बदल, आर्थिक विकास, प्रशासन, शिक्षण आणि नावीन्यपूर्ण संकल्पना या विषयांचा समावेश आहे. संस्थेच्या सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पीआयसीने मागच्या दोन वर्षांत दोन पुस्तके प्रकाशित केली असून, ती लोकप्रिय ठरली.

हेही वाचा… वर्धापनदिन विशेष : किंग ऑफ व्हॅक्सिन

पीआयसी ही सर्वसमावेशक ‘थिंक टँक’ असून, त्याचे कार्यक्रम सर्वांसाठी खुले असतात. यात अपवाद फक्त राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित व तत्सम अशा काही कार्यक्रमांचा असतो. पुण्यातील विविध भागांत पीआयसीचे कार्यक्रम होत असून, त्यात यशदा, सीओईपी, सिम्बायोसिस आणि गोखले इन्स्टिट्यूट यांचा समावेश आहे. पीआयसी अनेक संस्थांसोबत सहयोग करून विविध कार्यक्रम आयोजित करते. त्यातील एक प्रमुख कार्यक्रम म्हणजे ‘एशिया इकॉनॉमिक डायलॉग.’ भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयासोबत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि मंत्रालयाच्या वार्षिक तीन प्रमुख कार्यक्रमांपैकी हा एक आहे. या कार्यक्रमात भू-अर्थशास्त्राविषयी मुद्दे केंद्रस्थानी असतात. यंदा एशिया इकॉनॉमिक डायलॉग २९ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होत आहे. याला १२ विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, त्याचे उद्घाटन भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या हस्ते होईल.

‘थिंक टँक’चे काम हे कार्यक्रम आयोजित करणे आहे, असे अनेकांना वाटते. ते खरंय मात्र त्यासोबतच प्रत्यक्षात ‘थिंक टँक’चा गाभा हा सरकारी धोरण ठरविण्यासाठी शिफारशी करणे हा असते. सार्वजनिक धोरणाबाबत शिफारशी करण्याचे महत्त्वाचे काम पीआयसीकडून सुरू आहे. यातील काही शिफारशी सरकारने स्वीकारल्या असून, त्यांची अंमलबजावणीही झाली आहे. त्याचसोबत हेही सत्य आहे की काही शिफारशी स्वीकारण्यास वेळ लागत असून, काहींवर तर विचारही होत नाही. सार्वजनिक धोरणाच्या शिफारशी करण्यासाठी सरकारच्या अनेक विभागांसोबत काम करण्याची संधी पीआयसीला मिळत आहे. त्यात पर्यावरण, शिक्षण, वाणिज्य, संरक्षण आणि परराष्ट्र या विभागांचा समावेश आहे.

राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज संस्थांनाही धोरणात्मक शिफारशी करण्याचे काम पीआयसी करते. करोना संकटाच्या काळात पीआयसीने केलेल्या काही शिफारशी स्वीकारण्यात आल्या आणि त्यांची अंमलबजावणीही झाली. ठरावीक कालावधीसाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याची मोठी शिफारस पीआयसीने केली होती. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगाराच्या नोकऱ्या टिकण्यास मदत झाली. नंतर अनेक राज्यांनी याचे अनुकरण केले. पीआयसीच्या शिफारशीनुसार, पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी ‘कार्बन न्यूट्रल पुणे’ हे धोरण स्वीकारले.

हेही वाचा… वर्धापनदिन विशेष : सक्षम मानसिक आरोग्यासाठी

सार्वजनिक धोरण निर्मितीच्या संशोधनातील सहभाग वाढविण्यासाठी पीआयसी तरुण संशोधकांना संधी देत आहे. हे संशोधक पीआयसीच्या अनुभवी सदस्यांसोबत संशोधन निबंध लिहितात. माजी राजदूत, माजी लष्करी अधिकारी, प्राध्यापक आणि अनेक कंपन्यांचे प्रमुख यासारखे पीआयसीचे अनुभवी सदस्य या कामी मार्गदर्शन व मदत करीत आहेत. अशा सर्वसमावेशक ‘थिंक टँक’ला सर्वांसाठी खुले असणारे आणखी कार्यक्रम घेता यावेत व धोरणात्मक निर्णयासाठीच्या शिफारशी मांडण्याचे अधिक काम करता यावे, यासाठी एक नवीन वास्तू बांधली जात आहे. चालू वर्षाच्या शेवटपर्यंत ही वास्तू उभारण्याचे नियोजन व सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत.

‘थिंक टँक’ राष्ट्र उभारणीमध्ये महत्त्वाचं योगदान देतात मात्र ‘थिंक टँक’ सर्वच काही करू शकतात असेही नाही. कोणत्याही संस्थेच्या काही मर्यादा असतात तशाच ‘थिंक टँक’च्या ही काही मर्यादा असतात. प्रत्येक ‘थिंक टँक’ महत्त्वाच्या प्रत्येक विषयावर धोरणात्मक शिफारशी मांडू शकेल असे नाही. तसेच ‘थिंक टँक’ने मांडलेल्या प्रत्येक शिफारशीची दखल घेतलीच जाईल ही अपेक्षा बाळगणेही अव्यवहार्य आहे. मात्र काही शिफारशींची दखल घेतली जाते व त्यावर अंमलबजावणी केली जाते आणि त्यातून सार्वजनिक हित साधले जाते. यातून सार्वजनिक हितासाठी विचारांची ताकद कशी वापरली जाते याची अनुभूती येते. तेरा वर्षांपूर्वी पिंगळे मळ्यात झालेली चर्चा ते पाषाण परिसरात उभी होत असलेली पीआयसीची वास्तू हा प्रवासदेखील सार्वजनिक हितासाठी मांडलेल्या विचारांची ताकद व ते विचार कार्यान्वित करण्यासाठीच्या नि:स्वार्थी सामूहिक योगदानाचे फलित आहे.