डॉ. मोहन आगाशे

यशस्वी आणि आनंदी आयुष्यासाठी शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे आहे. मात्र बदललेली जीवनशैली आणि काळानुरूप झालेले सामाजिक बदल याचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असतो. समाजामध्ये मानसिक आरोग्य खालावलेल्या व्यक्तींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. उदाहरणार्थ. उदासीनता, ताणतणावांचे आजार, विविध व्यसनांचे आजार, लैंगिक समस्या, आत्महत्या इत्यादी. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण २०१६ नुसार भारतामध्ये गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांचे प्रमाण जवळपास १३.७ टक्के आहे. यानुसार महाराष्ट्रात एकूण १२ कोटी ६६ लाख लोकसंख्येपैकी अंदाजे १ कोटी ७५ लक्ष लोकांना मानसिक आजार आहे. ही आकडेवारी अलीकडच्या काळातील असली, तरी तीन दशकांपूर्वीच मानसिक आजारांकडे वेळीच लक्ष देण्यासाठी, त्याबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते आणि बी. जे. वैद्याकीय महाविद्यालयाच्या मनोविकृतीशास्त्र विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. मोहन आगाशे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या दूरदृष्टीतून मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात जागृती निर्माण करणे, मानसिक आरोग्य या विषयातील शिक्षण, प्रशिक्षण, सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था ही स्वतंत्र संस्था १९९१ मध्ये स्थापन झाली. या संस्थेच्या कामाचा व्याप गेल्या तीन दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे.

women empowerment, unique initiative,
महिला सक्षमीकरणाचा अनोखा उपक्रम!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा – कृषी घटकपरिसंस्था आणि पर्यावरण
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
The developer for the Municipal Corporation project to withdraw the redevelopment of Kamathipura from MHADA
कामाठीपुराचा पुनर्विकास ‘म्हाडा’कडून काढून घेण्याच्या हालचाली; विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे निर्णय?
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
Contract recruitment continues through service provider company in government various departments
कंत्राटी भरतीचा पुन्हा धडाका, तीन वर्षे नियमित भरतीची शक्यता धूसर
Important observations in the hearing letter of the National Green Tribunal regarding development works by blocking drains
नाले बंदिस्त करून विकासकामे करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना चपराक; राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या सुनावणी पत्रात महत्वाची निरीक्षणे

महाराष्ट्र सरकारने १९८८ मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम स्वीकारला. या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात मनुष्यबळाचा अभाव असल्याचे डॉ. मोहन आगाशे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले. त्याशिवाय या क्षेत्रात मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आणि तत्कालीन व्यावसायिकांच्या क्षमतावृद्धीसाठी डॉ. परळीकर, गुलबानी, पांडे यांच्या सहकार्याने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. या प्रकल्पाचा अभ्यास करून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९९० मध्ये महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ही संस्था १९९१ मध्ये प्रत्यक्षात सुरू झाली. संस्थेची कल्पना मांडलेले डॉ. मोहन आगाशे यांच्याकडेच संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचे सोने करत डॉ. आगाशे यांच्या नेतृत्वाखाली चौफेर काम सुरू झाले.

हेही वाचा… वर्धानपनदिन विशेष : पुण्याचं विस्तारणारं शैक्षणिक क्षितिज

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासह मानसिक आरोग्य क्षेत्रात तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करणे, मानसिक आरोग्य विषयात संशोधन करणे, मानसिक आरोग्य विषयात विविध नवीन अभ्यासक्रमांची निर्मिती करणे, मनोविकृतीशास्त्रात पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण व परिचारिकांना प्रशिक्षण देणे, व्यसनमुक्ती आणि मतिमंदांच्या समस्या हाताळणे, वैद्याकीय अधिकारी व शुश्रूषा करणाऱ्या कर्मचारी वर्गास प्रात्यक्षिकांचा अनुभव देणे, मानसिक आरोग्य विषयात निरनिराळे शैक्षणिक प्रकल्प राबविणे व जनजागृती करणे, जिल्हा पातळीवर व रुग्णालयाबाहेर, सामाजिक क्षेत्रात मानसिक आरोग्य सल्ला आणि सेवा उपलब्ध करणे अशी संस्थेची प्रमुख उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली.

या संस्थेने १९९३ मध्ये झालेल्या किल्लारी भूकंपावेळी साडेतीन हजारांहून अधिक लोकांना मानसशास्त्रीय आधार दिला. राज्यात राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी समन्वयक संस्था म्हणून महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेवर जबाबदारी सोपवण्यात आली. २०११ मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून संस्थेची निवड करण्यात आली. त्या अंतर्गत केंद्र सरकारकडून ३० कोटी रुपयांचा निधी संस्थेला मिळाला.

नाशिक महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठ, राष्ट्रीय वैद्याक परिषदेशी ही संस्था संलग्नित आहे. सुरुवातीच्या काळात बी. जे. वैद्याकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयात असलेल्या या संस्थेची आता पाषाण येथे सुसज्ज इमारत आहे. संस्थेमार्फत मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी मोफत प्रशिक्षण दिनकेंद्र चालविण्यात येते. शहरातील गजबजाटापासून थोडेसे दूर निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने संस्थेचे मानसिक आरोग्यावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते.

हेही वाचा… Maharashtra News Live : मनोज जरांगेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार? शंभूराज देसाईंनी दिला इशारा, म्हणाले…

संस्थेने अनेक प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले. त्यात काही आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचाही समावेश होता. उदाहरणार्थ, वैद्याकीयदृष्ट्या स्पष्ट नसलेला आळस, अशक्तपणा याचा अभ्यास करण्यासाठीचा इंडो-अमेरिकन प्रकल्प. त्याशिवाय राज्यातील परिचारिकांना संभाषण कौशल्य, मानसिक आरोग्याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले. पुणे महापालिकेच्या शाळांतील शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अध्ययन अक्षमता, वर्तणुकीच्या समस्या, व्यसनाधीनता ओळखण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले.

संस्थेच्या आंतररुग्ण विभागात दाखल झालेल्या मनोरुग्णांचे पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत दिनकेंद्रामध्ये विविध कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. तसेच जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन, बस स्थानक अशा ठिकाणी मानसिक आरोग्याविषयी जनसामान्यांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना ताणतणाचे नियोजन, आवडीने अभ्यास करण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन केले जाते.

संस्थेच्या माध्यमातून मानसिक आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांना सेवा दिल्या जातात. त्यात आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण सेवा, मानसशास्त्रीय मूल्यांकन आणि मानसोपचार, डिसॅबिलिटी प्रमाणीकरण, मनोसामाजिक मूल्यांकन, मध्यस्थी आणि पुनर्वसन अशांचा समावेश आहे. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे मनुष्यबळ घडवणे हे महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे मानसोपचार, वैद्याकीय मानसशास्त्र, मानसशास्त्रीय पुनर्वसन, सायकोलॉजिकल नर्सिंग या क्षेत्रांत कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी विविध पदवी, पदविका, अल्प मुदतीचे अभ्यासक्रम राबवण्यात येतात. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्याचप्रमाणे शासन सेवेतील कार्यरत अधिकारी, कर्मचारी अतिरिक्त-प्रगत शिक्षणासाठी येतात. सायकॅट्रीक सोशल वर्क या विषयातील एम.फील.

हेही वाचा… पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

अभ्यासक्रम चालवणारी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. संस्थेमध्ये मानसिक आरोग्य या विषयात राज्यातील एकमेव असे अद्यायावत ग्रंथालय उपलब्ध आहे. या ग्रंथालयात मानसिक आरोग्य विषयावरील जागतिक दर्जाची पुस्तके, संदर्भ साहित्य उपलब्ध होते. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना ई-लायब्ररीची सुविधा देण्यात आली आहे.

आजवर या संस्थेतून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. हे विद्यार्थी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात राज्यात, देशात आणि परदेशातही कार्यरत आहेत. येत्या काळात संस्थेअंतर्गत २५० खाटांचे अद्यायावत मानसिक आरोग्य संकुल उभारण्याचे प्रस्तावित आहे.

(प्रथमेश गोडबोले)