पुण्याच्या मुंढवा येथील केशवनगर भागात दुमजली इमारत कोसळली होती. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ८ जणांची सुटका करण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. तर एक लहान मूल अजूनही या ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता आहे. त्याला सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुरावस्थेत असणारी ही इमारत ३० वर्षे जुनी होती. ही इमारत धोकादायक अवस्थेत असल्याची नोटीसही महापालिकेने संबंधितांना दिलेली होती. मात्र त्याची योग्य ती दखल न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.
#SpotVisuals: Rescue operation underway after a building collapsed near Keshavnagar in Pune's Mundhwa. 8 people have been rescued while one child is still feared trapped inside. The building was 30 years old and it was served a notice by municipal corporation. #Maharashtra pic.twitter.com/7qpnbNAb3M
— ANI (@ANI) July 21, 2018
इमारत पडल्याच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ४ गाड्या संबंधित ठिकाणी पोहोचल्या. सुरुवातीला या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची माहिती होती. पाच जणांना सुरुवातीलाच सुखरुप बाहेर काढण्यात आले होते. ते जखमी असल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करुनन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. याशिवाय आणखी काही जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. परिसरातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात काहीसे भितीचे वातावरण पसरले आहे. परंतु शहरातील जुन्या इमारतींचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.