करोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सध्या सुरू आहे. ज्यांना आधी करोना होऊन गेला आहे. त्यांनाही पुन्हा करोनाची लागण होत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. लक्षणं जाणवत असल्याने आपण टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आल्याची माहिती मोहोळ यांनी दिली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी याबद्दल ट्वीट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये मोहोळ म्हणतात, करोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेन.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहोळ यांना करोनाच्या पहिल्या लाटेतही करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेतले होते. आता तिसऱ्या लाटेमध्ये त्यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे. मोहोळ यांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोसही घेतले आहेत.