अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) गटात १३ विद्यार्थ्यांनी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) गटात १४ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेटाईल मिळवले.

हेही वाचा >>> पुणे : विद्यापीठातर्फे ६ नोव्हेंबरला पीएच.डी. प्रवेश परीक्षा

राज्य सीईटी सेलमार्फत ही परीक्षा ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी २२७ परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने १३ दिवसांत २५ सत्रांत घेण्यात आली. पीसीएम गटातून २ लाख ३१ हजार २६४, तर पीसीबी गटातून २ लाख ३६ हजार ११५ अशा एकूण ४ लाख ६७ हजार ३७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात २ लाख २ हजार ६१२ मुली, २ लाख ६४ हजार ७६७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पीसीएम गटात शंभर पर्सेंटाइल मिळवलेले १३ विद्यार्थी,, पीसीबी गटात शंभर पर्सेंटाइल मिळवलेले १४ विद्यार्थी, राखीव गटातून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची यादी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.