scorecardresearch

पुणे : MIT च्या इनक्युबेशन सेंटरमध्ये इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती; एका चार्जिंगमध्ये ७० ते ७५ किमी धावण्याची क्षमता, किंमत आहे…

इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असताना इलेक्ट्रिक सायकल हा सक्षम पर्याय आहे. व्यायामप्रेमींसह डिलिव्हरी बॉईज, विद्यार्थी यांच्यासाठी ही सायकल उपयुक्त ठरेल.

pune mit electric cycle
तीन वर्षांपासून सुरु होतं या सायकलीसंदर्भातील संशोधन

एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या एमआयटी टीबीआय इन्क्युबेशन सेंटरमध्ये इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती करण्यात आली आहे. दोन प्रकारच्या या सायकलमध्ये पॅडल आणि अॅक्सिलरेटरची सुविधा देण्यात आली असून, सिटी सायकल प्रारुप एका चार्जिंगमध्ये ३० ते ३५ किलोमीटर, ब्लॅक पर्ल हे मॉडेल एका चार्जिंगमध्ये ७० ते ७५ किलोमीटर धावू शकते.

एमआयटी टीबीआयचे संचालक डॉ. प्रकाश जोशी, बिग बॉईज इलेक्ट्रिक सायकलचे संचालक प्रशांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमआयटी टीबीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित साठे

संचालिका शीतल साठे, मुख्य व्यापार अधिकारी कैलास थोरात यांनी आदी या वेळी उपस्थित होते. सिटी सायकलचे मूल्य ३५ हजार ८८०, तर ब्लॅक पर्ल सायकल ४८ हजार ८८० रुपये आहे. डॉ. जोशी म्हणाले, इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असताना इलेक्ट्रिक सायकल हा सक्षम पर्याय आहे. व्यायामप्रेमींसह डिलिव्हरी बॉईज, विद्यार्थी यांच्यासाठी ही सायकल उपयुक्त ठरेल. गेली तीन वर्षे या सायकलचे संशोधन सुरू होते.

बाजारात उपलब्ध असलेल्या ई सायकलपेक्षा या दोन प्रारुपांच्या किंमती कमी आहेत. तसेच गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड करण्यात आलेली नाही. या सायकलचे वेगळेपण म्हणजे ग्राहक अतिरिक्त बॅटरी सोबत ठेवू शकतो, बॅटरी काढू शकतो. पहिल्या शंभर ग्राहकांत लकी ड्रॉ काढून तीन ग्राहकांना मोफत सायकल दिली जाईल. तसेच जुनी सायकल दिल्यास पाच हजारांपर्यंत सूट दिली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune mit electric cycle pune print news scsg

ताज्या बातम्या