पुणे : किरकोळ बाजारात ६०० रुपये किलो असे उच्चांकी दर मिळालेल्या शेवग्याच्या दरात घट झाली आहे. शेवग्याच्या दरात घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. बाजारात गुजरातमधील शेवग्याची आवक सुरू झाल्याने दरात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

आमटी, सांबारात सढळ हाताने वापरण्यात येणाऱ्या शेवग्याची आवक कमी झाल्याने तीन आठवड्यांपूर्वी ६०० रुपये किलो असे उच्चांकी दर मिळाले होते. शेवगा महाग झाल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडले होते. शेवगा खरेदीकडे गृहिणींनी पाठ फिरवली होती. उपाहारगृहचालकांकडून शेवग्याचा सांबारात वापर करण्यात येतो. शेवगा महाग झाल्याने उपाहारगृहचालकांकडून शेवग्याला बेताची मागणी होती. तीन आठवड्यांपूर्वी घाऊक बाजारात दहा किलो शेवग्याला ३५०० ते ४००० रुपये दर मिळाले होते. हवामान बदल आणि थंडीमुळे पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख बाजार समितीच्या आवारात शेवग्याची आवक कमी झाली होती.

हेही वाचा – ९२ वर्षीय वृद्धाची कर्करोगावर मात अन् शस्त्रक्रियेनंतर चारच दिवसांत घरी! आधुनिक उपचार पद्धतीविषयी जाणून घ्या…

u

शेवग्याची लागवड आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, तसेच महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. तीन आठवड्यांपूर्वी घाऊक बाजारात शेवग्याची आवक कमी झाल्याने उच्चांकी दर मिळाले होते. उच्चांकी दर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी तोड करून मोठ्या प्रमाणावर शेवगा विक्रीस पाठविला. त्यानंतर शेवग्याचे दर कमी झाले. शेवग्याचे दर कमी झाले असून, यापुढे दरवाढ होण्याची शक्यता नाही, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील शेवगा व्यापारी रामदास काटकर यांनी दिली.

गुजरातमधील शेवग्याचा हंगाम सुरू

गुजरातमधील शेवग्याचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गुजरातमधून दररोज १०० ते १२५ डाग (एक डाग ३० ते ३५ किलो) शेवग्याची आवक होत आहे. गुजरातमधील शेवग्याची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. गुजरातमधील शेवग्याचा हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू असतो. त्यानंतर सोलापूर, नाशिक भागातील शेवग्याचा हंगाम सुरू होतो. तामिळनाडू, आंध्र प्रदेशातील शेवग्याचा हंगाम चार महिने असतो. परराज्यातील शेवग्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेवग्याला ग्राहकांकडून जास्त मागणी असते.

हेही वाचा – सिंहगड रस्त्यावर कोयत्याच्या धाकाने ५० हजारांची लूट

शेवगा बारमाही आहे. गुजरातमधील शेवग्याचा हंगाम सुरू झाला आहे. पुढील आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर परिसरातून शेवग्याची आवक सुरू होईल. शेवग्याची आवक वाढल्याने दरात घट झाली असून, यापुढील काळात शेवग्याच्या दरात फारशी वाढ होणार नाही. – रामदास काटकर, शेवगा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

शेवग्याचे दर

घाऊक बाजार (एक किलो) – १२० ते १६० रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरकोळ बाजार (एक किलो) – २०० ते २४० रुपये