पिंपरी- चिंचवड: पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वार्डनने बस चालकाकडून वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरून पैसे घेतल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. संतप्त नागरिकांनी वार्डनला मारहाण केल्याच देखील व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ही घटना आज दुपारी घडली आहे.

पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग हा अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो. याच मार्गावर उर्से टोलनाका येथे हा सर्व प्रकार घडला आहे. वाहतूक पोलिसांच्या वार्डनने बस चालकाकडून पाचशे रुपये घेतल्याचा आरोप नागरिकांनी आरोप केला आहे. वार्डनला संतप्त नागरिकांनी मारहाण देखील केली आहे. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच नाव घेतल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

मारहाण केल्याच देखील व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. याप्रकरणी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित वाहतूक पोलीस आणि वार्डनची चौकशी करण्यात येत आहे. रात्री उशिरा पर्यंत कारवाई होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे. घटनेमुळे पुन्हा एकदा वाहतूक विभागाची नाचक्की झाली आहे. संबंधित वाहतूक पोलीस आणि वार्डनवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांची आहे.