केंद्र आणि राज्य शासनाला अपेक्षित स्मार्ट सिटी, चोवीस तास पाणी पुरवठा, केबल डक्ट, सायकल योजना अशा एक ना अनेक विधायक योजना महापालिकेच्या माध्यमातून राबवताना अक्षरश: नागरिकांचा रोष पत्करणारे आयुक्त कुणाल कुमार यांची बुधवारी राज्य शासनाने बदली केली. केंद्रात गृहनिर्माण विभागाच्या सहसचिव पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अनेक अधिकारी वर्गाने काम केले आहे. मात्र, सर्वाधिक काळ कुणाल कुमार यांनी आयुक्त म्हणून काम पाहिले. त्यांच्या अगोदर महापालिका आयुक्त म्हणून विकास देशमुख यांनी अगदी काही महिने काम पाहिले होते. त्यांच्यानंतर कुणाल कुमार यांनी महापालिकेची साडे तीन वर्षांहून अधिक काळ धुरा सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात नदी सुधार प्रकल्प, चोवीस तास समान पाणी पुरवठा, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि केबल डक्ट हे विषय खूप गाजले. हे विषय मंजुरीसाठी आले असताना विरोधकांनी नेहमीच त्यावर आक्षेप घेतले. तर आयुक्तांना अनेक विषयात कोंडीत पकडण्याचे काम लोक प्रतिनिधींनी केले आहे. मात्र, या सर्वांवर नेहमीच महापालिका आयुक्तांनी मात केल्याचे पहायला मिळाले आहे.

त्यामुळे आयुक्त कुणाल कुमार यांची बदली केव्हा होणार याकडे अनेक राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते. आज राज्य शासनाने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात गृहनिर्माण विभागाच्या सहसचिव पदी बदली केली. आता त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती केली जाते, हे पाहावे लागणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal commissioner kunal kumar transferred
First published on: 07-03-2018 at 22:06 IST