Latest News in Pune Today : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून, प्रगती आणि आसावरी जगदाळे जखमी झाल्या आहेत. संतोष जगदाळे आणि जखमी महिला पर्यटक एकाच कुटुंबातील आहेत. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शहरातील प्रमुख राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात आला. यानिमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) वतीने श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. तर, दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून आंदोलन करण्यात आले. पुणे शहर आणि जिल्ह्याशी संबंधित विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल…
Pune Maharashtra News Today 24 April 2025
पिंपरीत आनंद नगर झोपडपट्टीत भीषण आग; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पिंपरीत आनंद नगर झोपडपट्टीत फायबर च्या संडास बाथरूम ला भीषण आग लागलीय. आनंद नगर झोपडपट्टीतील नागरिकांसाठी महानगर पालिकेकडून उभारण्यात आलेल्या फायबर संडास बाथरूम ला दुपारी दोन च्या सुमारास भीषण आग लागली. आजूबाजूच्या घरांना देखील झळ पोहचलीय. अग्निशमन दलाची पाच वाहन घटनास्थळी दाखल झाली, असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधीच ऊन आग ओकत आहे. अशातच आग लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांना उष्ण झळा पोहचत आहेत.
'लहान लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या….' संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती यांनी कथन केला विषण्ण करणारा अनुभव
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांचे पार्थिव आज सकाळी पुण्यात, शरद पवार यांची सांत्वनपर भेट
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील कर्वेनगर येथील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला.त्यानंतर त्यांचे पार्थिव आज सकाळी पुण्यातील निवासस्थानी आणण्यात आले.त्यावेळी शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत विचारपूस केली.त्यानंतर संतोष जगदाळे यांच्या निवासस्थान येथून वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली.
ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली आणि वैकुंठ स्मशानभूमीत दहा वाजण्याच्या सुमारास पार्थिव पोहोचले.त्यावेळी संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी यांनी सर्वविधी केले आणि विद्युत दाहीनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.





शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली

संतोष जगदाळे यांच्यावर त्यांची मुलगी आसावरी जगदाळे ही अंत्यविधी करणार

अनधिकृत हाेर्डिंग लावू नका; नेत्यांनी कार्यकर्त्यांना सांगण्याचे पिंपरी महापालिकेचे पत्रातून आवाहन
पुणे : शहरात सतर्कतेचा आदेश, संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ
पुण्यात कार्यालयीन जागांच्या मागणीत वाढ
विज्ञान-तंत्रज्ञान मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही, व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांचे मत
उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शक प्राधिकरण, धोरण निर्मितीच्या सल्ल्यासाठी ‘महासार्क’ची स्थापना
"विमान कंपन्यांनी पर्यटकांची अडवणूक करू नये", खासदार सुप्रिया सुळे यांची सूचना
पिंपरी-चिंचवडमधील ३२ पर्यटक काश्मीरमध्ये
विनोदाच्या प्रांतात महिला कमीच! ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचे मत
हज यात्रेकरूंसाठी लसीकरण मोहीम, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने २६ एप्रिलला आयोजन
दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू, ५२० पर्यटकांना परत आणण्यासाठी प्रयत्न
कलाकारांचे ‘विद्यापीठ’ घडविणारे एफटीआयआय आता अभिमत!
पुणे : समाविष्ट गावांतील बंधारे, तलावांचे पालिकेकडून संरक्षण; अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची माहिती
पुणे : दहशतवादी हल्ल्याचा राजकीय पक्षांकडून निषेध
पुणे : शहरातील साडेचार लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, महापारेषणच्या जेजुरीतील वीजवाहिनीत बिघाड
"संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधारावर कारवाई व्हावी", अंजली दमानिया यांची मागणी
(संग्रहित छायाचित्र)