Latest News in Pune Today : चिंचवड स्टेशन लोहमार्गावरील पुलाचा उताराकडील काही भाग कोसळल्याने हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे गुंतवणुकीच्या आमिषाने ठेवीदारांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले असून, या गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करण्यासाठी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण (एमपीआयडी) या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तेव्हा पुणे शहर, पिंपरी – चिंचवड तसंच पुणे परिसर आणि जिल्ह्यातील वाहतुक, गुन्हे, न्यायालयीन घडामोडी, महानगरपालिका- नगरपरिषद – ग्रामपंचायत तसंच सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल.

Live Updates

Pune Maharashtra News Today, 26 march 2025

19:13 (IST) 26 Mar 2025

सराइताकडून सहा लाखांचे मेफेड्रोन जप्त, गणेश पेठेत पोलिसांची कारवाई

पुणे : मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या सराइताला फरासखाना पोलिसांनी गणेश पेठ परिसरातून अटक केली. त्याच्याकडून पाच लाख ८८ हजारांचे २९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले.

वाचा सविस्तर...

17:41 (IST) 26 Mar 2025

पिंपरी- चिंचवड मधील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीला भीषण आग

पिंपरी- चिंचवड मधील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीला भीषण आग लागली आहे. साडेतीनच्या सुमारास कंपनीतील स्क्रॅप ला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील १० अग्निशमन दल (बंब) घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. अद्याप आग कशामुळे लागली याचं कारण समजू शकलेलं नाही. कामगारांना बाहेर काढण्यात आलं आहे. अद्याप जखमी किंवा जीविहितहानी झाल्याच वृत्त नाही.

17:30 (IST) 26 Mar 2025

मुलाच्या विवाहासाठी कष्टाने कमावलेला ऐवज डोळ्यादेखत चोरीला

पुणे : मुलाच्या विवाहासाठी एका महिलेने कष्टाने दोन लाखांची रोकड जमाविली. सुनेसाठी दागिनेही घडवून घेतले. दिवसभर दुकानात थांबाावे लागत असल्याने महिला दररोज ऐवज पिशवीत घेऊन दुकानात यायची. दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या एका महिलेने चार लाख ५७ हजार हजार रुपयांचा ऐवज असलेली पिशवी चोरून नेल्याची घटना वारजे भागात घडली.

वाचा सविस्तर...

17:30 (IST) 26 Mar 2025

खडकी बाजारात ज्येष्ठाकडील दहा लाखांची रोकड लुटली

पुणे : ज्येष्ठ नागरिकाकडील एक लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्याने चोरून नेल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर...

17:29 (IST) 26 Mar 2025

महाराष्ट्राचा झेंडा दिल्लीत फडकला… ई साहित्याला राष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था यांच्यातर्फे आयोजित ‘ऑल इंडिया चिल्ड्रन्स एज्युकेशनल ई-कंटेंट कॉम्पिटिशन’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी ई शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत यश मिळवले आहे.

वाचा सविस्तर...

17:06 (IST) 26 Mar 2025

केशवनगर भागात तीन दुकानांना आग, सुदैवाने काेणी जखमी नाही

पुणे : मुंढव्यातील केशनवगर भागात तीन दुकानांना आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. दुकाने बंद असल्याने सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.

केशवननगर भागातील लोणकर चौकात असलेल्या तीन दुकानांना सकाळी नऊच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या हडपसर केंद्राला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर आणि बी. टी. कवडे रस्ता अग्निशमन केंद्रातील जवान किरण शिंदे, गणेश पवळे, बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले, अविनाश ढाकणे, अमोल शिरसाट, शुभम डुमे, संदीप रणदिवे, हर्षल पवार, प्रणय कवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीत दुकानातील साहित्य जळाले. दुकाने बंद असल्याने गंभीर दुर्घटना टळली. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

16:14 (IST) 26 Mar 2025

कोथरूड भागात दुचाकी चोरट्यांना पकडले; तीन दुचाकी जप्त

पुणे : कोथरूड भागातून दुचाकी चोरून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

आकाश सुरेश वाघिरे (वय २१, रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ, शिवाजीनगर), आदित्य भारत जाधव (वय २१, रा. मनोहर क्लासिक बिल्डींग, चंदननगर, खराडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कोथरूड भागातून नुकतीच दुचाकी चोरीला गेली होती. दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. गोपीनाथ नगर भागातील मेघसृष्टी इमारतीजवळ दुचाकी चोरटे वाघिरे आणि जाधव थांबल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस शिपाई योगेश सुळ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने वाघिरे आणि जाधव यांना पकडले. दोघांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे असलेली दुचाकी पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातून चोरल्याची कबुली दिली. चौकशीत दोघांनी कोथरूड आणि लोणी काळभोर भागातून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. वाघिरे आणि जाधव यांच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

16:05 (IST) 26 Mar 2025

आयआयटीच्या धर्तीवर आता ‘सीओईपी’मध्ये चेअर प्रोफेसरशिप; एक कोटी रुपयांच्या देणगीतून उपक्रमाची अंमलबजावणी

पुणे : शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या हेतूने सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने आयआयटीच्या धर्तीवर ‘चेअर प्रोफेसरशिप’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सीओईपीच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात येत असून, ज्येष्ठ उद्योजक, नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी ‘चेअर प्रोफेसरशिप’साठी एक कोटी रुपयांची देणगी सीओईपीला दिली आहे.

वाचा सविस्तर...

15:52 (IST) 26 Mar 2025

रस्त्यांची वहनक्षमता वाढविण्याला प्राधान्य

पुणे : शहरातील वाहतुकीची गती वाढविण्यासाठी पुढील टप्प्यात रस्त्यांची वहनक्षमता (कॅरिंग कपॅसिटी) वाढविण्याला प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, रस्त्यांचा पूर्णत: वापर वाहतुकीसाठीच व्हावा, या दृष्टीनेही नियोजनाला सुरुवात झाली आहे.

वाचा सविस्तर...

15:44 (IST) 26 Mar 2025

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात सर्वंकष धोरण; महापालिकेचा निर्णय

पुणे : शहरातील गृहसंकुले, मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये उभारण्यात आलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर बंद ठेवले जात असल्याने आता गृहप्रकल्पातील एसटीपी प्रकल्पांसाठी सर्वंकष धोरण तयार केले जाणार आहे.

वाचा सविस्तर...

15:44 (IST) 26 Mar 2025

शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळ्यांसाठी पाचशे किलोमीटर लांबीच्या केबल्स टाकण्यास मान्यता

पुणे : शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी आणि इटिग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) उभारण्यासाठी पाचशे किलोमीटर लांबीच्या केबल्स शहरात टाकण्यात येणार आहेत.

वाचा सविस्तर...

15:43 (IST) 26 Mar 2025

अल्पवयीन मुलींवर बलात्कार; शिवाजीनगर पोलिसांकडून अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा

पुणे : शिवाजीनगर भागात किरकोळ वस्तूंची विक्री करुन उदरनिर्वाह करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

11:57 (IST) 26 Mar 2025

वृद्ध आई-वडिलांना पोटगी देण्यास नकार देणाऱ्या मुलाची न्यायालयाकडून कानउघाडणी; दरमहा १६ हजार पोटगी देण्याचे आदेश

पुणे : वृद्ध आई-वडिलांना पोटगी देण्यास असमर्थता दर्शविणाऱ्या मुलाची न्यायालयाने कानउघाडणी केली. ‘आई-वडिलांची काळजी घेणे हे मुलाचे कर्तव्य असून, ती कायदेशीर जबाबदारी आहे,’ असे निरीक्षण नोंदवून कौटुंबिक न्यायालयातील न्यायााधीश के. व्ही. ठाकूर यांनी आई-वडिलांना दरमहा १६ हजार रुपये पोटगी देेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

सविस्तर वाचा...

11:56 (IST) 26 Mar 2025

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा वेगाने छडा; पोलीस दलात लवकरच विशेष ‘एमपीआयडी’ कक्ष; ठेवीदारांना दिलासा

पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ठेवीदारांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले असून, या गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करण्यासाठी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण (एमपीआयडी) या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.

सविस्तर बातमी...

11:55 (IST) 26 Mar 2025

भूतकाळाला पराभूत करून ‘भविष्य पेरणाऱ्या’ महिलांची वर्तमानातील गोष्ट!

‘मकाम’ आणि ‘सोपेकाम’ या संस्थांतर्फे छायाचित्रे, भित्तिचित्रे, लघुपट, काव्यवाचन, व्याख्यान अशा बहुविध माध्यमांतून शेतकरी महिलांचे जगणे मांडणाऱ्या ‘भविष्य पेरणाऱ्या…’ या कला महोत्सवाचे आयोजन नुकतेच पुण्यात करण्यात आले होते.

सविस्तर बातमी...

11:54 (IST) 26 Mar 2025

रिंगरोडला निधीचा अडसर

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली असली तरी, रिंगरोडला निधीचा अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या मोबदल्यापोटी वाटपासाठीचा सुमारे ३ हजार ६१४ कोटींचा थकीत निधी तातडीने वितरीत करावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडून रस्ते विकास महामंडळाकडे करण्यात आली आहे.

सविस्तर बातमी...

11:53 (IST) 26 Mar 2025

ग्रापंचायत कर्मचाऱ्याकडून जिल्हा परिषदेत नोटांची उधळण

पुणे : जिल्हा परिषदेच्या नोकर भरती प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत मावळ तालुक्यातील एका ग्रमापंचायत कर्मचाऱ्याने जिल्हा परिषदेच्या आवारात नोटांची उधळण करत आंदोलन केले.

सविस्तर बातमी...

11:52 (IST) 26 Mar 2025

चिंचवड स्टेशन लोहमार्गावरील पूल बंद; काही भाग कोसळला, वाहतूक कोंडीत भर

पिंपरी : चिंचवड स्टेशन लोहमार्गावरील पुलाचा उताराकडील काही भाग कोसळल्याने हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चिंचवड स्टेशन येथून गावात जाणारी हलकी वाहतूक बाजूच्या पुलावरून वळविली आहे. एकच पूल सुरू असल्याने चिंचवड स्टेशन येथील वाहतूककोंडीत भर पडत आहे.

वाचा सविस्तर...

11:50 (IST) 26 Mar 2025

पिंपरी महापालिका-जलसंपदा विभागात वाद; आंद्रा धरणातून पाणीपुरवठ्यात कपात

पिंपरी : महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या वादात समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा १५ दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. जलप्रदूषण आणि पाणीपट्टीपोटी ८९ काेटी रुपयांची मागणी करून जलसंपदा विभागाने आंद्रा धरणातून साेडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात केली आहे.

सविस्तर बातमी...

11:49 (IST) 26 Mar 2025

‘कॅलिडोस्कोप’मधून उलगडला दळवींचा लेखनप्रवास

पुणे : चित्रपटातील दृष्यफिती, नाटकातील काही अंशांचे तसेच ‘सारे प्रवासी घडीचे’ या आत्मकथनपर लेखनाचे अभिवाचन अशा ‘कॅलिडोस्कोप’मधून ज्येष्ठ लेखक-नाटककार जयवंत दळवी यांचा लेखनप्रवास उलगडत मंगळवारी जन्मशताब्दीनिमित्त दळवी यांना अभिवादन करण्यात आले.

सविस्तर वाचा...

11:48 (IST) 26 Mar 2025

पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष

पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक झाला होता. त्यामुळे रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील पाण्याचे ३१२ नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यातील ७९ ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले असून, ते पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सविस्तर वाचा...

 

Pune News Live Today in Marath

पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स

Pune News Today in Marath

पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स