पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना पोलिसांनी शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात पकडले. सराइतांकडून दोन पिस्तुलासंह तीन काडतुसे जप्त करण्यात आली. शुभम अनिल शिंदे (वय २४, रा. महर्षीनगर) आणि सिद्धेश अशोक शिगवन (वय १९, रा. गुलटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

हेही वाचा – पुणे : ठशांवरुन घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा माग, मार्केट यार्ड परिसरातील घरफोडीचा गुन्हा उघड

हेही वाचा – जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा नवोदित कलाकारांना कानमंत्र; म्हणाल्या, ‘अभिनय करताना’…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात (सेव्हन लव्हज चौक) शिंदे आणि शिगवन थांबले होते. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांची झडती घेण्यात आली. दोघांकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले, तीन काडतुसे जप्त करण्यात आली.
खडक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, हवालदार ठवरे, जाधव, ढावरे, चव्हाण यांनी ही कारवाई केली. शिंदे आणि शिगवन यांनी पिस्तूल का बाळगले, तसेच त्यांना पिस्तूल कोणी दिले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.