scorecardresearch

मद्यपी मुलाकडून आईवर चाकूने हल्ला ; लोणी काळभोरच्या कदमवाक वस्तीमधील घटना

लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती येथील बालाजी हाईस इमारतीत ही घटना घडली

मद्यपी मुलाकडून आईवर चाकूने हल्ला ; लोणी काळभोरच्या कदमवाक वस्तीमधील घटना
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आईवरच चाकूने हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती येथील बालाजी हाईस इमारतीत ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा >>> चंद्रकात पाटील म्हणतात गणेशोत्सवात थोडा अतिरेक झाला….

अभिजित गोपीचंद दरेकर (वय ३२, रा. बालाजी हाईटस, संभाजीनगर, कदमवाकवस्ती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सिंधू गोपीचंद दरेकर (वय ५०) या जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित हा सिंधू दरेकर यांचा मुलगा असून, गेल्या अनेक दिवसांपासून त्याला दारूचे व्यसन आहे. तो काही कामधंदाही करीत नव्हता. त्यामुळे कुटुंबात सातत्याने वादावादी होत होती. बुधवारी संध्याकाळी सव्वासात वाजता तो घरी आला. त्यावेळी त्याने आईला शिवीगाळ केली. ‘तुम्हाला लय मस्ती आली, मी आज तुम्हाला जिवंत सोडत नाही’, असे म्हणून त्याने घरातील चाकू आणून आईवर वार केले. आईच्या डोक्यावरही त्याने चाकूने मारहाण केली. या प्रकारात सिंधू या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या