पुणे: उधारी चुकविण्यासाठी पैसे न दिल्याने आईला बेदम मारहाण करणाऱ्या मुलास फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मी राजू सूर्यवंशी (वय ५४, रा. कसबा पेठ) यांना मारहाण केल्याप्रकरणी शंभो राजू सूर्यवंशी (वय २९) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत प्रियंका भरत सूर्यवंशी (वय २५) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रियंका या आरोपीच्या वाहिनी आहे. त्यांचे पती एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत कामाला असून ते बाहेरगावी होते. तर आरोपी शंभो हा बेरोजगार असून तो सहसा घरी राहत नाही. अद्याप तो अविवाहित आहे. तो बाहेरच मेसवर जेवतो. मेससह इतर ठिकाणी त्याचे तब्बल ३५ हजार रुपये देणे बाकी होते. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती.

मंगळवारी (१७ जून) फिर्यादी आणि त्यांच्या सासू या घरी होत्या. दोनच्या सुमारास आरोपी घरी आला. त्याने त्याची आई लक्ष्मी यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर चिडून आरोपीने गॅलरीमधून लोखंडी रॉड घेवून लक्ष्मी यांच्या हातावर, पाठीवर तसेच दोन्ही पायांवर मारहाण केली. त्यानंतर आरोपी घरातील ५३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल बळजबरीने घेऊन गेला. झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार केली तर सगळ्यांना जिवे मारण्याची धमकी त्याने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आरोपीच्या वाहिनीने याबाबत फरासखाना पोलिसांत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रणील चौगुले तपास करीत आहेत.