पुणे : शहर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून चोरट्यांनी नवी मुंबईतील खारघर परिसरात दुचाकी चोरीचा गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे.

अभिजीत आदेश आडसुळे (वय २२, रा. घोरपडी), सादिक युनिस पटेल (वय १८, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आडसुळे आणि पटेल सराईत चोरटे आहेत. पुणे स्टेशन परिसरात दोघे जण दुचाकी चोरीसाठी येणार असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. दोघांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे उघडकीस आले. पोलिसांना दुचाकीच्या डिक्कीत लोखंडी कोयता सापडला.

हेही वाचा – वाकडेवाडी एसटी स्थानकात ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे दागिने लंपास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आडसुळे आणि पटेल यांनी वारजे, बंडगार्डन, तळेगाव दाभाडे, नवी मुंबईतील खारघर परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक आश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे, अमोल सरडे, शिवाजी सरक, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, सतीश मुंढे आदींनी ही कारवाई केली.