पुणे शहरातील नागरिकांसाठी तसेच कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोलीसांची तात्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या My Safe Pune या अॅपचं आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्याचबरोबर पोलिसांसाठीच्या बदली अॅपचंही उद्धाटन करण्यात आलं.

My Safe Pune अॅपची कार्यपद्धतीः
या अॅपची निर्मिती पुणे शहरातल्या नागरिकांसाठी तसंच घटनास्थळी पोलिसांची तात्काळ सेवा मिळावी यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपची संकल्पना पुणे शहराच्या पोलीस आयुक्तांची आहे. या अॅपच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी मदत होणार आहे.

Dudhganga tap water scheme,
इचलकरंजीची दूधगंगा नळपाणी योजना रखडल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राजू शेट्टी यांचे टीकास्त्र
Chief Minister Eknath Shindes rally to campaign for Mahayuti candidate Rajshree Patil Mahale
भर उन्हात मुख्यमंत्र्याचे जय श्रीराम, जय हनुमान…
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’

आणखी वाचा- मोठी बातमी: आषाढी वारीसंदर्भात अजित पवारांनी जाहीर केला निर्णय

घटनास्थळाची माहिती किंवा महत्त्वाच्या ठिकाणचे फोटो या अॅपवर अपलोड करता येणार आहेत. नागरिकही आपल्या आजूबाजूच्या घटनांबद्दल माहिती देऊ शकतात. अशा प्रकारे फोटो अपलोड केल्याने घटनेच्या ठिकाणाचे अक्षांश, रेखांश आणि वेळ नोंद केली जाईल. या अॅपवरुन पोलीस नियंत्रण कक्ष माहिती मिळवेल आणि आजूबाजूच्या परिसरातल्या गस्तीवर असणाऱ्या बीट मार्शलला त्याची माहिती दिली जाईल.

त्याचबरोबर बीट मार्शलने कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी भेट दिली याची सर्व माहिती या अॅपमध्ये साठवण्यात येईल.