पुणे : पद्मावती भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहकारनगर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. या कारवाईत भारतीय जनता पक्षाच्या पर्वती मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांसह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पद्मावती भागात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांच्या पथकाला सोमावारी रात्री मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसंनी भारतीय जनता पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस, तसेच पाच ते सहा जणांना पत्ते खेळताना पकडले. पोलिसांनी तेथून पत्ते, रोकड, तसेच अन्य साहित्य जप्त केले. जुगार अड्ड्यावर भाजपच्या पर्वती मतदारसंघातील पदाधिकाऱ्याला पकडल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती सहकारनगर पोलिसांनी दिली.

मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौकात मटक्याची चिठ्ठीघेणाऱ्या एकाला खडकी पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून मटक्याच्या आकड्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार अमजद शेख यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार रेंगडे तपास करत आहेत.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस शिपाई सूरज कुंभार यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार दडस तपास करत आहेत.

वारजे माळवाडी भागात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस शिपाई सुनील मुठे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक लुगडे तपास करत आहेत.

शहरातील जुगार अड्डे, मटका अड्ड्यांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. जुगार अड्डा चालविणारे अनेक जण सराइत आहेत. कारवाई केल्यानंतर पुन्हा छुप्या पद्धतीने जुगार अड्डे चालवित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपनगरात जुगार अड्डे मोठ्या प्रमाणावर चालविले जाता