scorecardresearch

गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यांवर छापा; हडपसर, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

आरोपींकडून रोकड तसेच जुगाराचे साहित्य असा २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

gambling
सातजण जुगार खेळत असताना पोलिसांचा छापा (फाइल फोटो)

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकला. या प्रकरणी १४ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

फुरसुंगीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळी तेथे सातजण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी दादासाहेब तुपे (रा. फुरसुंगी ), प्रफुल्ल मोहन कामठे (वय ३५ चांभळी सासवड), किरण भैरु चव्हाण (वय २९ रा. हरपळे वस्ती), दिपक ललन निशाद (वय २५ रा. कोंढवा), विलास शरणाप्पा चौगुले (वय ४८ रा. फुरसुंगी), प्रकाश तानाजी हरपळे (वय ३३), भीमा किसन कदम (वय ६० रा. फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून रोकड तसेच जुगाराचे साहित्य असा २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोणी काळभोरमध्ये मटका जुगार अड्डयावर छापा टाकून सात जणांना अटक करण्यात आली. युवराज (पुर्ण नाव नाही), संतोष बबन टकले, (वय २९) शमशुद्दीन मैनुद्दीन शेख (वय ५७) मोहन नागनाथ पोतू (वय ३३), अजय हिरामण चव्हाण (वय २६) लक्ष्मण जानू राठोड (वय ४८) इस्माईल मोहम्मद शेख (वय ५७) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, प्रमोद मोहिते, आण्णा माने, बाबा कर्पे, मनीषा पुकाळे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune police raid on many places related to gambling pune print news scsg

ताज्या बातम्या