पुणे : दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रोहित मुकेश चव्हाण असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी विवेक पाटील यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चव्हाण मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयसमोर थांबला होता. दारुच्या नशेत त्याने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (कंट्रोल रुम) संपर्क साधला. मला पोलीस मदत हवी आहे. ३० ते ४० जण तलवार घेऊन मंगळवार पेठेत फिरत असून, माझ्या जीवाला धाेका आहे, अशी माहिती त्याने मोबाइलवरुन पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाने त्वरीत फरासखाना पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

हेही वाचा…School Girl Molestation In Pune : रिक्षाचालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा चौकशीत असा प्रकार घडला नसल्याचे उघड झाले. पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांची दिशाभूल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक डुकरे तपास करत आहेत.