पुणे शहरात मागील काही दिवसापासुन करोना विषाणू रुग्णांची संख्या वाढत असून आज एकाच दिवसात ४७२ रुग्ण आढळल्याने पुणेकरांसाठी चिंतेची बाब आहे. तर त्याच दरम्यान दिवसभरात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशभरात करोना विषाणूचे रुग्ण वेगाने वाढत आहे, अशीच परिस्थिती पुण्यात देखील आहे. पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ४७२ रुग्ण आढळल्याने, एकूण रुग्णसंख्या ११ हजार ११५ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्या १९३ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ६ हजार ९०६ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.
पुणे शहरात वाढती रुग्ण संख्या गंभीर होऊन बसली आहे. आता ही रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन काय, उपाययोजना करते पाहावे लागणार आहे.