पुणे : मच गया शोर… गोविंदा रे गोपाळा… यांसारख्या पारंपरिक गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी ७ थर लावून फोडली. मंगळवारी रात्री ९ वाजून ८ मिनिटांनी दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. विराज कांबळे या बालगोविंदाने हंडी फोडली. तर नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्टमधील वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करुन उपस्थितांना ठेका धरायला लावला.

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, तुषार रायकर यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – पिंपरी : बैठकीत अधिकारी मोबाईल पाहण्यात दंग, आयुक्त संतापले; म्हणाले…

हेही वाचा – पिंपरी : दूषित वाहते ‘इंद्रायणी’! जल शुद्धीकरणावर कोट्यवधी खर्च…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्याच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षक असलेल्या सुवर्णयुग तरुण मंडळाचा दहीहंडी उत्सव पाहण्याकरिता गोपाळ भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यंदाच्या वर्षी साकारण्यात आलेला भव्य ३० फूट उंचीचा एलईडी लाईट देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला ५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.