पुणे : केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या २०२४च्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे महापालिकेचे स्थान उंचावले आहे. यंदा पुणे महापालिकेने देशात आठवा क्रमांक, तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. मागील वर्षी महापालिकेला ९ वा क्रमांक मिळाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ सर्वेक्षण सुरू केले आहे. दर वर्षी यामध्ये देशातील विविध शहरे त्यात सहभागी होतात. शहरांमध्ये स्वच्छतेसाठी केले जाणारे प्रयत्न, प्रशासनाकडून राबविले जाणारे प्रकल्प याची पाहणी करून याचे नामांकन ठरविले जाते. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्थिती, घरोघरी संकलित होणारा कचरा व वस्ती पातळीवर कचऱ्याचे नियोजन, कचऱ्यावरील प्रक्रिया याची प्रत्यक्ष केली जाणारी पाहणी, नागरिकांचा सहभाग, केंद्र शासनाकडून फोनद्वारे नागरिकांकडून घेतला जाणारा अभिप्राय यांसह अनेक निकषांचा विचार केला जातो.

यंदा या स्पर्धेत पुणे महापालिकेेचे मानाकंन सुधारले आहे. देशात कोरोनाच्या लाटेनंतर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत २०२० साली पुणे महापालिकेला १५ वा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर २०२१ मध्ये महापालिकेने थेट पाचव्या क्रमांकवर झेप घेतली होती. २०२३ मध्ये पुण्याचा देशात नववा क्रमांक आला होता. गेल्या वर्षी २०२४ मध्ये पुणे महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षणात देशात आठवा क्रमांक आला. यंदा पुणे महापालिकेने आठवा क्रमांक मिळविला आहे.

पुणेकर नागरिक, महापालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे सांघिक यश आहे. पहिल्या तीन क्रमांकांत शहराचा समावेश कसा होईल, यासाठी प्रयत्न राहणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी रात्री कचरा गोळा करण्यासारखे इतर काही उपक्रम राबिण्याचा आगामी काळात प्रयत्न आहे. – संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घनकचरा व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्यासाठी पुण्याला मोठी संधी आहे. घनकचरा व्यवस्थापनाबाबत सर्वसामान्य पुणेकरांना काय वाटते, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. हा क्रमांक उंचाविण्यासाठी येत्या वर्षात विशेष उपक्रम राबवून प्रयत्न केले जातील. – नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका