पुण्यातील लोणी काळभोर परिसरात राहणार्‍या ११ वर्षीय मुलीला तुझ्या वडीलांना मारून टाकेन,आईच देखील बरे वाईट करेल,अशी धमकी देऊन २४ वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मुलगी चार महिन्याची गरोदर राहिल्यानंतर ही घटना समोर आली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोन्या ऊर्फ सिद्धराम भालेराव (२४) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोन्या ऊर्फ सिद्धराम भालेराव हा पीडित मुलीच्या वडीलांच्या गॅरेजमध्ये कामाला होता. घराच्या अगदी जवळ गॅरेज असल्याने आरोपीची कुटुंबीयांसोबत ओळख होती. पीडित मुलीची आई धुणी भांड्याचे काम करत असल्यामुळे ती घरी नसायची. आरोपीने या गोष्टीचा फायदा घेत ऑक्टोबर २०२१ पासून तीन ते चारवेळा लैंगिक अत्याचार केले.

जर तू हे कोणाला सांगितले तुझ्या वडिलांना मारून टाकेन आणि आईसोबत बरे वाईट करेल, अशी धमकी देऊन आरोपी तिच्यावर अत्याचार करत राहिला. दोन दिवसापूर्वी पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरनी मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पीडित मुलीच्या आईने आमच्याकडे येऊन सर्व हकिकत सांगितली. त्यानुसार आरोपी सोन्या ऊर्फ सिद्धराम याला अटक करण्यात आली असल्याचे पोलिस उपनिरीक्षक पी. चौगुले यांनी सांगितले.