घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. हडपसर पोलिसांनी चोरट्यांकडून ११ लाख ९६ हजारांचे सोन्याचे दागिने तसेच मोटार असा मुद्देमाल जप्त केला.

अक्षयसिंग बिरुसिंग जुनी (वय १९), जितसिंग राजपालसिंग टाक (वय १९), लकीसिंग गब्बरसिंग टाक (वय १९, तिघे रा. वैदुवाडी, रामटेकडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अक्षयसिंग जुनी आणि त्याचे साथीदार जितसिंग, लकीसिंग यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडीचे गुन्हे केले होते. जुनीला गुन्हे शाखेने नुकतेच पकडले. तपासात त्याने साथीदार टाक यांच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले होते. जितसिंग आणि लकीसिंग यांना तुळजापूर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली होती. दोघेजण उस्मानाबाद येथील कारागृहात होते.

हडपसर पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने टाक यांना ताब्यात घेतले. तपासात जुनी आणि टाक यांनी घरफोडीचे चार गुन्हे केल्याचे उघडकीस आले. आरोपींकडून ११ लाख ९६ हजारांचे सोन्याचे दागिने तसेच मोटार जप्त करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अकुंश बनसुडे आदींनी ही कारवाई केली.