पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) कोंडी सोडविण्यासाठी सिग्नल यंत्रणा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विद्यापीठ चौक सिग्नलमुक्त केल्यानंतर वाहतुकीचा वेग वाढेल. शिवाजीनगरकडून ओैध, बाणेरकडे जाणाऱ्या वाहनांनी विद्यापीठ चौकात न थांबता पाषाण रस्ता, अभिमानश्री सोसायटीमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

विद्यापीठ आणि ओैंधकडे जाणाऱ्या वाहनांनी बाणेर रस्त्याने राजभवनच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्याचा वापर करावा. या रस्त्याने ओैंधकडे जावे. गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर विशेषत : विद्यापीठ चौकात कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. विद्यापीठ चौकापासून शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालय चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात, तसेच ओैंध-बाणेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. गणेशखिंड रस्त्याची पाहणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच केली. त्यांनी उपाययोजना सुचविल्या. त्यानुसार ओैंध, बाणेरकडून येणारी वाहने तसेच, शिवाजीनगरकडून विद्यापीठ चौकातून ओैंध, बाणेर, पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांनी सिग्नलला न थांबता इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले.

mumbai, Aarey land, to store construction materials, Metro 6
मेट्रो ६ चे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी ‘आरे’तील जमिनीचा वापर
Pune, Father, murder son, pune latest news,
पुणे : वडिलांनी दिली मुलाला मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव

हेही वाचा…पिंपरी : गृहनिर्माण संस्थेतील थकबाकीदारांचे नळजोड खंडित करणार

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत बदल पुढीलप्रमाणे- शिवाजीनगरकडून गणेशखिंड रस्त्याने रेंजहिल्सकडे जाणाऱ्या वाहनाांना बंदी घालण्यात आली आहे. विद्यापीठ चौकातून थेट औंध बाणेरकडे जाण्यास बंदी. वाहनचालकांनी पाषाण रस्ता, अभिमानश्री सोसायटीमार्गे इच्छितस्तळी जावे. विद्यापीठ चौकातून सेनापती बापट रस्त्याकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग

शिवाजीनगरकडून रेंजहिल्सकडे जाणाऱ्या वाहनांनी कॉसमॉस बँकेसमोरुन वळून (यू टर्न) इच्छितस्थळी जावे. विद्यापीठ चौकातून सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कॉसमॉस बँकेकडून वळून इच्छितस्थळी जावे. बाणेरकडे जाणाऱ्या वाहनांनी विद्यापीठ चौकातून पाषाण रस्ता, अभिमानश्री सोसायटीमार्गे इच्छितस्थळी जावे. बाणेर आणि ओैंधकडे जाणारी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी राजभवनच्या मागील बाजूस असलेला रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. ओैधकडे जाणाऱ्या वाहनांनी अभिमानश्री सोसायटीमार्गे ओैंधकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा.

हेही वाचा…कात्रजमध्ये क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार

गणेशखिंड रस्त्यावर जड वाहनांना बंदी

गणेशखिंड रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अवजड वाहनांना २४ तास बंदी घालण्यात आली आहे. गणेशखिंड रस्त्यावरील चापेकर चौक ते विद्यापीठ चौक, बामेर रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटी ते विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू मॅरीएट चौक ते विद्यापीठ चौक या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.