बेकायदेशीर सावकारी करीत साडेसहा लाखांचे तब्बल ११ लाख ५० हजार वसूल करूनही आणखी पावणेदोन लाख रूपये मागणाऱ्या सावकाराला खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली. त्याशिवाय साडेचार लाखांचे ८ लाख ४८ हजार वसूल करीत आणखी साडेतीन लाख रूपये मागणाऱ्याला आणखी एका सावकाराला बेड्या घातल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

झहीर जुल्फीकार सय्यद (वय ४४ रा. माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदाराने  अडचणीत असल्यामुळे  झहीरकडून पाच लाख रूपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात झहीर प्रत्येक महिन्याला ४० हजारांची वसूल  करीत होता. ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ कालावधीत दोन वर्षांत आरोपीने त्यांच्याकडून तब्बल १० लाख ४८ हजार वसूल केले.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या गुन्ह्यात साडेसहा लाखांच्या बदल्यात तब्बल ११ लाख ५० हजार रूपये वसूल करूनही आणखी पावणेदोन लाखांची मागणी करणाऱ्या सावकाराला अटक केली. कासिब कादीर कुरेशी (वय ३३  रा. गाडीतळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदाराने कासिबकडून डिसेंबर २०२० मध्ये साडेसहा लाख रूपये व्याजाने घेतले होते. आरोपीने फेब्रुवारी २०२२ पर्यंत त्यांच्याकडून ११ लाख ५० हजार रूपये वसूल केले.