लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजीची प्रतिकृती, श्री कसबा गणपती व श्री तांबडी जोगेश्वरी या पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आणखी वाचा- जागतिक बँकिंग संकटाला कारणीभूत असलेल्या चुका भारतातही घडल्या! सुरेश प्रभूंचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाश माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. या पुरस्काराचे यंदा ३३ वे वर्ष आहे. जुलैमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. आगाशे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सीमेवर लढताना जखमी झालेल्या सेलर राधाकृष्णन्,  हवालदार पंजाब एन. वाघमारे, सेलर सुदाम बिसोई, गनर उमेंद्र एन. आणि लान्स नाईक  निर्मलकुमार छेत्री याजवानांना गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी कळविले आहे.