पुणे : पुणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असून, या वाहनांचे तातडीने लेखापरीक्षण करावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिरोळे यांनी शालेय वाहतुकीच्या वाहनांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. खराडी येथील शालेय विद्यार्थ्यांच्या बसला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा दाखला देत शिरोळे म्हणाले, ‘पुणे शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जिवाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्यात आठ हजारांहून अधिक वाहनांमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होत असते. या सर्व वाहनांचे वेळोवेळी लेखापरीक्षण करणे गरजेचे आहे. अशा वाहनांना आग लागल्यास, दुर्घटना घडल्यास कोणत्या उपाययोजना करायच्या, याचे प्रशिक्षण महानगरपालिका आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) देणे महत्त्वाचे आहे.’

हेही वाचा – सवाई गंधर्व महोत्सवासाठी पीएमपीची विशेष बससेवा, कोणत्या मार्गांवरून कधी धावणार बस ?

हेही वाचा – पुणे : खड्डे मुक्त रस्ता अशी ओळख जपणारा जंगली महाराज रस्ता खचला? नक्की काय झाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बस किंवा ‘व्हॅन’मध्ये आग लागल्यास अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पूर्तता आहे किंवा नाही याची वेळोवेळी तपासणी व्हावी. ही यंत्रणा कोणत्या ठिकाणी बसवली जावी, त्याचा वापर कसा करावा, विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे कसे बाहेर काढावे याचे वाहनचालकासह इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जावे, अशी मागणी शिरोळे यांनी या वेळी केली.