पुणे : गुरुवार पेठेतील फुलवाला चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवार पेठेतील फुलवाला चौकात एका गल्लीत मटका अड्डा सुरू होता. याबाबतची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने १६ जणांना ताब्यात घेतले, तसेच जुगार अड्ड्याच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – “कसब्यात भाजपाने पोलिसांना बरोबर घेऊन पैसे वाटले”; रविंद्र धंगेकरांचा मोठा आरोप

हेही वाचा – पुणे: नागरी सेवा संयुक्त परीक्षा २०२३ द्वारे ६७३ पदांची भरती प्रक्रिया; ४ जूनला ३७ जिल्हा केंद्रावर पूर्व परीक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, बाबा कर्पे, मनीषा पुकाळे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, इम्रान नदाफ, हनुमंत कांबळे आदींनी ही कारवाई केली.