लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे गोवा, दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस दक्षिण कोकण आणि कोल्हापुरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
MHADA Lease Renewal Linked to Ready Reckoner Rates Housing Societies Face High Renewal Costs
म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच! दंडात्मक तरतुदीत सहा महिन्याची सवलत
water storage in balkawadi dam
सातारा : बलकवडीचा जलसाठा तळाशी; धरणात फक्त २२ टक्के मृत पाणीसाठा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य मोसमी वारे दक्षिण भारतात सक्रिय झाले आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला आहे. हे वारे तेलंगणा, कर्नाटक ओलांडून गोवा आणि दक्षिण कोकणापर्यंत येत आहेत. त्यामुळे गोव्यासह दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून, किमान तापमानात वाढीचा अंदाज आहे.

आणखी वाचा-सरकारी कामकाजाचा अजब नमुना! ससूनची चौकशी १५ दिवस अन् अहवाल पोहोचायला १२ दिवस

राज्यात शुक्रवारी ३७.० अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी कमाल तापमानाची नोंद रत्नागिरी येथे झाली आहे, तर औरंगाबाद येथे १४.८ अंश सेल्सिअस इतक्या सर्वांत किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यभरात किमान तापमानात वाढ झाली आहे.