scorecardresearch

पुणे: ‘साहेब तुम्ही बसा, मी मागे आहेच’; वसंत मोरेंच्या विधानाची चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे पक्षावर नाराज आहेत. ते मनसे सोडणार असल्याची चर्चाही सातत्याने होत आहे.

पुणे: ‘साहेब तुम्ही बसा, मी मागे आहेच’; वसंत मोरेंच्या विधानाची चर्चा
धायरी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना राज ठाकरे यांच्याबरोबर नाराज वसंत मोरे ही उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  पदाधिका-यांच्या जनसंपर्क कार्यालय उद्धाटना वेळी राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यामधील संवादावरून चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे उद्घाटन करून कार्यालयात आले. त्यावेळेस खुर्चीवर बसताना  खुर्ची व्यवस्थित आहे ना?, मागे कोणाची तरी खुर्ची तुटली होती, अशी विचारणा केली. ” राज ठाकरेंच्या या प्रश्नावर  “चंद्रकांत पाटील यांची खुर्ची तुटली होती, असे सांगतत वसंत मोरे यांनी ‘साहेब तुम्ही बसा, मी मागे आहेच’ , असे उत्तर दिले. मोरे यांच्या या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> पुणे: राहुल गांधींची तुलना प्रभू रामचंद्रांबरोबर केल्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी; भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची  मागणी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे पक्षावर नाराज आहेत. ते मनसे सोडणार असल्याची चर्चाही सातत्याने होत आहे. त्यातच राज ठाकरे यांनी काहीदिवसांपूर्वी मनसे पदाधिका-यांना पत्राद्वारे कार्यकर्त्यांना आणि पदाधिका-यांना ताकीद दिली होती. या माध्यमातून वसंत मोरे यांच्यावरच राज ठाकरे यांनी निशाणा साधल्याचे बोलले जात होते.

धायरी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना राज ठाकरे यांच्याबरोबर नाराज वसंत मोरे ही उपस्थित होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 15:36 IST

संबंधित बातम्या