पिंपरी- चिंचवड: ‘राज ठाकरे के छाती पर चढूँगा मैं’, म्हणणाऱ्या गोलू नावाच्या सुरक्षा रक्षकाला मनसे सैनिकांनी तंबी देऊन समज दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आळंदीमधील ब्लिंकइट कंपनीतील आहे.
“राज ठाकरे के छाती पर चढूँगा मैं… गोलू नाम है मेरा…ज्या जिसको दिखाने है दिखा हिंदुस्थान में…मैं नहीं डरता किसी राज ठाकरे से.” असं म्हणणाऱ्या गोलूला मनसे सैनिकांनी धडा शिकवला आहे. परराज्यातील नागरिक राज ठाकरे यांच्याबद्दल नेहमीच असं बोलत असतानाचे व्हिडिओ सर्रास व्हायरल होतात. हा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून आळंदी मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर यांनी अद्दल घडवली आहे.
ब्लिंकइटमध्ये सुरक्षा असलेला गोलू तेथील मराठी कामगार मुलांना नेहमी त्रास द्यायचा. यावरून तो थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल उलटसुलट बोलला. आळंदी मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर आणि मनसे सैनिक थेट तिथे पोहचले. हे बघून गोलुने हात जोडून माफी मागितली. सुरक्षा रक्षक गोलू म्हणाला, मी माफी मागतो, राज ठाकरे यांच्याबद्दल मी उलटसुलट बोललो आहे. त्यांच्याबद्दल मला काही माहीत नव्हतं. महाराष्ट्रातील ते मोठे नेते आहेत, हे मला माहित नव्हतं. मी पुन्हा असं करणार नाही. मी जे म्हणलं त्याबद्दल मी माफी मागतो.
