पिंपरी-चिंचवड : भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्यात आणखी भर टाकण्याचे काम रक्षाबंधनाच्या माध्यमातून होते. आपल्या बहिणीची रक्षा करण्याचं वचन हे आजच्या दिवशी राखी बांधून बहीण घेत असते. पिंपरी-चिंचवड मधील सांगवी भागात राहणाऱ्या एका भावाला मात्र आपल्या बहिणीची आठवण खूप सतावते. दोन वर्षांपूर्वी स्नेहा आपल्या भावाला सोडून देवाघरी गेली आहे. परंतु तिची आठवण मनात ठेवून गणेशने अनाथ आश्रमात असणाऱ्या मुलीला आपली बहीण मानले असून तो तिच्याकडून राखी बांधून घेतो.

अचानक आलेल्या ताप थांडीमुळे स्नेहा काची हिचा वयाच्या २१ व्या वर्षी मृत्यू झाली. दोन वर्षांपूर्वी काची कुटुंबवर दुःखाचा डोंगर कोसळला. स्नेहाला प्रेमाने छकुली म्हणायचे. काची यांच्या तीन कुटुंबात छकुली ही एकुलती एक मुलगी होती. तिला सख्खे आणि चुलत असे सहा भाऊ होते. मात्र तिची अकाली एक्झिट ही मनाला चटका लावणारी होती. जन्मत:च छकुलीच्या हृदयात होल होते. तिच्यावर अनेक रुग्णालयात उपचारही केले होते. छकुली मोठी होईल तसे होल कमी होईल असे डॉक्टरांनी घरच्यांना सांगितलं. या समस्येवर मात केलेल्या छकुलीला अचानक मध्ये तिला ताप आणि थंडी भरली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

नेहमी हसतमुख, हुशार, मनमिळावू अशी छकुलीची ओळख अत्यंत प्रेमाने आणि नम्रतेने ती बोलायची. तिला मेकअप करण्याची खूप आवड होती. तिच्यात साठ टक्के अपंगत्व असल्याचेदेखील काही वर्षांनी समोर आले होते. रक्षाबंधनाचा दिवस आला की छकुलीला मेकअप पेटी आणि ड्रेस ही गणेश कडून ठरलेली भेट असायची. मात्र,गेली दोन वर्षे झाली तिच्यावाचून रक्षाबंधन अधुरं असून गणेश तिच्या आठवणीतच रमतो. गणेश या गोड बहिणीला विसरू शकत नाही. आपल्या याच लाडक्या बहीणीच्या आठवणीत गणेश अनाथाश्रमातील मुलीला छकुली मानत तिच्याकडून राखी बांधून घेतो.