महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील ४३७ भूखंड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. त्यामुळे विकास आराखडा आणि प्रादेशिक योजनेतील रस्ते आणि अन्य सार्वजनिक सेवासुविधांसाठी या भूखंडांचा वापर करता येणार असून समाविष्ट गावांच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील अंतर्गत रस्ते, विकास आराखड्यासह प्रादेशिक योजनेतील रस्ते आणि सुविधा क्षेत्राचे ४३७ भूखंड पीएमआरडीएकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. शासनाच्या नगर विकास विभागाकडील ४ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयान्वये महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली ११ गावे (लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (संपूर्ण साडे सतरा नळी), शिवणे (संपूर्ण उत्तमनगर) शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी व उरुळी देवाची) आणि ३० जून २०२१ रोजीच्या अधिसूचनेद्वारे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली २३ गावे (म्हाळुंगे, सुस, बावधन बु., किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बु., नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी व वाघोली) पीएमआरडीएकडून हस्तांतरित केलेले अंतर्गत रस्त्याचे १०१ भूखंड, प्रादेशिक योजना व विकास आराखड्यातील रस्ते व सुविधा क्षेत्राचे प्रत्येकी १६८ भूखंड असे एकूण ४६७ भूखंड महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत.

महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या संचिका यापूर्वीच महानगरपालिकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

वर्ग केलेल्या प्रकरणांचा तपशील खालीलप्रमाणे

तपशील एकूण भूखंड क्षेत्र चौरस मीटरमध्ये

अंतर्गत रस्ते १०१ १,१५,९५०.२०

डीपी किंवा आरपी रस्ते क्षेत्र १६८ १,६३,१७२.६९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुविधा क्षेत्र १६८ २,३७,३४८.३६