लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शाळकरी मुलीला दारु पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीच्या मित्रांसह एका मैत्रीणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेले अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी आणि एका मुलाची ओळख होती. त्याने मुलीला आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीच्या मैत्रिणीने मुलीला फूस लावून एका मित्राच्या घरी नेले. तेथे तिला दारु पाजली. दारुच्या नशेत मुलीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. मित्राबरोबर असलेल्या एकाने मोबाइलवर छायाचित्रे काढल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड तपास करत आहेत.

आणखी वाचा-जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, निवासस्थानांवर छापा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीवर बलात्कार करणारा अटकेत

वारजे भागात एका मुलीवर विवाहाच्या आमिषाने बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अवि कालीदास पोपळघट (वय २०, रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी) याला अटक करण्यात आली. याबाबत एका मुलीने वारजे पोलीस ठाम्यात फिर्याद दिली आहे. मुलीची आणि आरोपी पोपळघटची ओळख होती. पोपळघटने मुलीला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर मुलीवर त्याने मुलीवर बलात्कार केला. मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती समजली. तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे तपास करत आहेत.