पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आज(सोमवार) सकाळी ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखळल करणार आहेत. काँग्रेसने रविंद्र धंगेकरांना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यामुळे त्यांची लढत भाजपाच्या हेमंत रासने यांच्याशी पाहायला मिळणार आहे.

काँग्रेसकडून प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, धंगेकर आणि रोहित टिळक यांची नावे चर्चेत होती. मात्र काँग्रेसने धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

दोन्ही उमेदवार आज अर्ज भरणार

रासने आणि धंगेकर यांच्याकडून आज उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती येथून प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे. रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.