कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बाळासाहेब दाभेकर मंगळवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दाभेकर यांच्याकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी बाळासाहेब दाभेकर यांनी केली होती. उमेदवारी न दिल्यास बंडखोर म्हणून निवडणूक लढण्याची भूमिका काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी जाहीर केली होती. मात्र, काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांचे नाव जाहीर केले. धंगेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे दाभेकर यांनी जाहीर केले. त्यामुळे, काँग्रेसला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – पुण्यात खराडीमध्ये बांधकाम प्रकल्पात सुरुंगाचा स्फोट, मजुराचा मृत्यू, एक जखमी

हेही वाचा – “शरद पवारांनी पुढाकार घेऊन चिंचवड, कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी”, चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन, अंधेरी निवडणुकीचा दिला दाखला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दाभेकर यांच्याकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरापासून दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. केसरीवाडा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरमार्गे गणेश कला क्रीडा रंगमंच असा दुचाकी फेरीचा मार्ग आहे. दाभेकर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याने त्यांच्या बंडखोरीचा फटका काँग्रेसला बसेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.