दत्ता जाधव
देशात अद्यापही पिझ्झा, बर्गर सारखे जंकफूड खाण्याची क्रेझ आणि ट्रेंड कायम असताना. युरोप, आखाती देश आणि जपानने सर्वाधिक पौष्टिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृणधान्यांच्या बियाणांची भारतातून विक्रमी आयात केली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये देशातून जगभरातील देशांना ४८० कोटी रुपये किमतीच्या बियाणांची निर्यात करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>सामायिक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळपत्रक जाहीर; ‘एमएचटी’-‘सीईटी’९ ते २० मे दरम्यान
चालू वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बियाणांच्या निर्यातीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरात तृणधान्यांविषयी जागृती वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून जगभरातून ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या बियाणांना मागणी वाढली आहे. विशेषकरून आखाती देश, जपान, जर्मनी आणि युरोपीयन देशांनी बियाणांची आयात करून आपआपल्या देशांत तृणधान्य उत्पादन करण्याचे धोरण आखले आहे.
हेही वाचा >>>विद्यापीठ शिक्षक निवडणुकीत विक्रमी ८० टक्के मतदान
२०२१-२२ या आर्थिक वर्षांत १०१ कोटी रुपयांच्या तृणधान्यांची निर्यात झाली आहे. पण, एकूण ४८० कोटी रुपये किमतीचे बियाणांची निर्यात झाली आहे. म्हणजे तृणधान्यांच्या निर्यातीपेक्षा बियाणांची निर्यात वाढली आहे. जगभरातील देशांनी तृणधान्ये आयात करण्यापेक्षा आपआपल्या देशात तृणधान्यांचे उत्पादन वाढविण्याचे धोरण आखले आहे.
अशी झाली तृणधान्यांची निर्यात
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ग्रेट मिलेट, अशी ओळख असलेल्या ज्वारीच्या १०,०९६ टन बियाणांची, तर बाजरीच्या ५२,२६६ टन आणि नाचणीच्या २१,१३० टन बियाणांची निर्यात झाली आहे. इतर राळ, कोद्रा, राजगिरा, वरई सारख्या तृणधान्यांच्या १५५ टन बियाणांची निर्यात झाली आहे.
चालू वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्या बाबत जगभरात जागृती होत आहे. तृणधान्यांचे आहारातील महत्त्व कळल्यामुळे आपल्याच देशात उत्पादन करण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी थेट तृणधान्यांची आयात न करता तृणधान्यांचे उत्पादन करण्यासाठी बियाणांचीच आयात करण्यावर भर दिलेला दिसून येत आहे.– गोविंद हांडे, शेतीमाल निर्यात सल्लागार, कृषी विभाग