पुणे : व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या (डीव्हीईटी) अधिपत्याखालील प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत शिक्षकीय संवर्गातील सातशे पदांची भरती करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथील एकूण सातशे पदे सरळसेवेद्वारे भरली जातील.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्यात ७ हजार ३९६ नियमित शिक्षकीय पदे मंजूर आहेत. त्यापैकी २ हजार ३६३ पदे रिक्त आहेत. कंत्राटी तत्त्वावरील एक हजार ५०० पदांपैकी १ हजार ९०१ पदे रिक्त आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील जास्त मागणी असलेल्या अभ्यासक्रमांची रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांसाठीची उपलब्ध यंत्रसामुग्री, स्कील गॅप धोरणानुसार पदाची आवश्यकता आदी बाबी विचारात घेऊन सरळसेवेच्या कोट्यातील १ हजार २०३ पदे भरण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यातील शिक्षकीय संवर्गातील (निदेशक) सातशे पदांची सरळसेवा कोट्यातून भरती करण्यास शासन नियुक्ती उपसमितीने मान्यता दिल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयांनुसार मुंबईमध्ये १८७, पुण्यामध्ये १०८, नाशिकमध्ये १०१, औरंगाबादमध्ये १०७, अमरावतीमध्ये ८५, नागपूरमध्ये ११२ अशी सातशे पदे भरण्यास मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.