हवामान विभागाकडून पुढील ४८ तासांसाठी इशारा

पुणे : हवामान विभागाकडून पुढील ४८ तासांसाठी पावसासंदर्भातील इशारा देण्यात आला आहे. त्यात घाट परिसरात रेड अलर्ट (अतिवृष्टी), तर शहरासाठी ऑरेंज अलर्ट (मुसळधार) असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात पाऊस सक्रीय झाला आहे. खडकवासला धरण भरल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाची सुरू असलेली संततधार अशीच दोन दिवस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेतील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील ४८ तासांत घाट परिसरात अतिवृष्टी, तर शहरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच नागरिकांनी घाट परिसरात जाणे टाळण्याचे आवाहनही करण्यात आले.