पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी नोंदणी बुधवारपासून ( १ मार्च) सुरू होणार आहे. ऑनलाइन अर्जांसाठी अंतिम मुदत १७ मार्च आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. आरटीई प्रवेशांसाठीची शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यार्थी नोंदणी कधी सुरू होणार या कडे पालकांचे लक्ष लागले होते. प्रवेशासाठी मुलाचे आधारकार्ड स्वीकारण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून सूचना देण्यात आल्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पालकांना १ मार्च ते १७ मार्च या कालावधीत अर्ज करता येईल.

हेही वाचा- आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठीच्या निवासी पुरावा कागदपत्रांत बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत आठ हजार ८२७ शाळांमध्ये एक लाख १ हजार ९२६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रांबाबतची माहिती https://student.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर देण्यात आली आहे.