यंदाच्या वर्षी तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी दिली. कोविड -१९ प्रकरणांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता रविवारी पहाटे पासून ३० मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामान्य परिस्थितीत, लाखो भाविक, बहुतेक करून वारकरी संप्रदायातील लोक, दरवर्षी बीज सोहळ्याचे औचित्य साधून मंदिराला भेट देतात. भाविकांचा असा विश्वास आहे की याच दिवशी संत तुकाराम महाराज आपल्या शेवटच्या कीर्तनाच्या वेळी स्वर्गात जाण्यासाठी निघाले होते.
टाळेबंदी असल्याकारणाने गेल्या वर्षीदेखील हा सोहळा निर्बंधातच साजरा करण्यात आला होता.

बंडातात्या कराडकर या वारकरी संप्रदायातील मोठ्या नेत्याने भक्तांना मोठ्या संख्येने देहू येथे येण्यास आणि सोहळ्यास उपस्थित रहायला सांगितल्यानंतर, पिंपरी चिंचवड पोलिसांनी या बंदीची घोषणा केली.

“पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे की वाढत्या कोविड प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर तुकाराम बीज सोहळ्याला प्रतीकात्मक पद्धतीने साजरे केले जाईल आणि केवळ ५० जणांनाच या कार्यक्रमाला हजेरी लावता येईल,” असे पोलिसांनी सांगितले.

कोणत्याही परिस्थितीत तुकाराम बीज साजरी करणारच; गुन्हे दाखल झाले तरी चालेल – बंडातात्या कराडकर

पोलिस उपायुक्त आनंद भोईटे पुढे म्हणाले, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ नेते बंडातात्या कराडकर यांनी नुकताच सोशल मीडियावर आणि मुलाखतीत भाविकांना देहू येण्यास आवाहन केले. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. वारकरी मोठ्या संख्येने देहू येथे आले तर त्या मंडळीमुळे कोविडचा प्रसार जास्त वेगाने होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त वारकरी संप्रदायाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत आणि भक्त मोठ्या संख्येने येथे जमा झाल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांची खात्री पटवून देत आहेत. ”

भोईटे पुढे म्हणाले, “प्रक्रियेचा एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात या पंथातील वरिष्ठ नेत्यांची बैठक घेण्यात आली. तेथे त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्या आवाहनास पाठिंबा दर्शविला जाणार नाही, असे आश्वासन दिले. देहू, विठ्ठलवाडी, माळवाडी, येळवाडी आणि भंडारा डोंगर भागात रविवारी सकाळपासून ३० मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restrictions on devotees attending tukaram beej ceremony as police order curfew in dehu sbi
First published on: 28-03-2021 at 17:00 IST